Posts

Showing posts from June, 2021

भातुकली

                                " ए आजी , आपण घर-घर खेळायचं  आहे आज , तू झोपायचं नाही हं ",  नातीचा हुकूम सुटला आणि मी झोपेला 'टाटा ' म्हंटलं . तिची आई भिशीला  जाणार म्हणून मला माझ्या आवडीचं  बेबी-सीटिंग  करायला मिळणार होतं  ! " तू बाळ, आणि मी आई  " "हो चालेल, मी झोपते चुपचाप " मी म्हटलं .  " ए नाही गं , तू खेळणारं  बाळ आणि ही  जोजो  'झोपकं'  बाळ , असं  म्हणून तिने जोजो नावाच्या तिच्या बाहुलीला झोपवलं . डोळे मिटते म्हणून ती जोजो .. पण ती आहे अत्यंत भेसूर ! तिचा एकच  डोळा उघडतो , एक वेणी नेहमी सुटलेली असते , आणि तिच्या चेहऱ्यावर ह्या बाईसाहेबांनी लाल आणि काळ्या स्केच पेनने बराच मेकअप करून ठेवलाय ! पण ती हवीच.  तिच्या शिवाय खेळ सुरूच होत नाही.  तर ही  छोटीशी  आई , घरभर हिंडून खेळ गोळा करत होती, आणि संसार मांडत होती . मला एक खूपच सुंदर कविता आठवली .   " चंदनाच्या विठोबाची माय  आज घरी गेली " !...