प्रार्थना
सध्या पूजा-अर्चा, कर्मकांड , इत्यादींचा मौसम आहे. आपल्याकडे आषाढी एकादशीला देव झोपतात, ते एकदम कार्तिकी एकादशीला उठतात. तेवढे मधले चार महिने पूजा-प्रार्थना, जप-जाप्य ,व्रतं - वैकल्य , उपास-तापास करायची, असा अधिनियम आपणच आपल्याला घालून घेतला आहे ... पण हा concept कसा काय मनात आला असेल किंवा त्याची जरूर का भासली असेल, असा विचार माझ्या मनात आला. आदि मानवाच्या काळी किंवा अश्मयुग, ताम्रयुग,लोहयुग ... वगैरे मानवाच्या मानसिक किंवा बौद्धिक उत्क्रांतीची किंवा विचार उत्क्रांतीची वाटचाल चालू असतांना प्रार्थना ही संकल्पना मनात आली असावी .. निसर्गातले महाभयानक बदल, कल्पनातीत वादळं, पाऊस, थंडी ... हे काहीही आपल्या हातात नाही हे लक्षांत आलं ... ह्या संकटांमुळे जीवन-मरणाचा संघर्ष चालू असतांना, त्यांच्या मनात येत असणार ... हे थांबो आता ... कोणीतरी यातून वाचवा ... आणि ते थांबल्यावर मनाला हायसं वाटलं असणार ... ते कोणीतरी, ज्याने हा त्रास संपवला, त्याचे आभार ... असं करतच निसर्ग हीच all powerful शक्ती ... तोच त्राता...रक्षणकर्ता ...त्याचं नाव ...