Posts

Showing posts from May, 2026

पुरुषोत्तम मास

       आजकाल पुण्यात कुठेही जा, सगळीकडे flex लागले आहेत ... अधिक मासानिमित्त ... भजन - पूजन - कीर्तन ... विष्णू सहस्त्रनाम, गीता पठण, भागवत वाचन ... देवळांमधे विविध पूजा ... आणि मिठाईच्या दुकानांत अधिक मासाकरता अनारसे !    हे सर्व अधिक मासानिमित्त आहे म्हटल्यावर ठरवलं की ह्याबद्दल काहीतरी लिहायचं ... आणि मग शोधायला लागले ...      पहीलं पुस्तक ... संपूर्ण चातुर्मास ... तर त्यात अगदी जुजबी माहिती ... चला,  पण सुरुवात तर झाली .   आणि मग मिळेल तसं लिहीत गेले.   मुळात प्रश्न की अधिक मास म्हणजे काय ... तो येतो कसा ... त्याचा हिशोब कसा करतात ... काहीच महिने अधिक येतात ... वगैरे ... आणि जितकं शोधू तितकं सापडत गेलं  ...     सौर वर्षातले दिवस ३६५ पण तिथ्या पाहिल्या तर ३७१, आणि चांद्र वर्षात ३६० तिथ्या येतात.   म्हणजे दर वर्षी ११ तिथ्यांचा फरक पडतो.   दर ३ वर्षांनी ३३ तिथ्या  होणार आणि  नवीन चांद्र वर्ष थोडं थोडं आधी सुरु होणार ... मग सगळे सणवार आणि ऋतूंचा ताळमेळ कसा ठेवायचा ?  ...

घर पहावं लावून ....

             लग्न पहावं करून  आणि  घर पहावं बांधून ... अशी आपली म्हण आहे.  त्यातला पहिला पार्ट तर झाला !   आता दुसरा पार्ट ... जो असा की आपण एकदाच काय, दोनदा - तीनदा करून बघू शकतो ... !   पहिल्या पार्टचं नको बोलायला ... आपल्या चुका आपणच कशाला जगजाहीर करा ... पण घराचं तसं नाही ... कुटुंब मोठं झालं म्हणून ... relocate झालो म्हणून ... सगळ्यांनाच दुसरा पार्ट पुन्हा पुन्हा व्हावासा वाटेल आयुष्यात ... निदान मला तरी तसं वाटत होतं  ...       ... तर , त्याची गोष्ट ... लग्न झालं आणि मी सासरी आले.   एकत्र कुटुंब ... म्हणजे सासू सासरे आणि आम्ही दोघे ... घर सगळं लागलेलं ... सर्व सुस्थितीत ... त्यामुळे भाजी आणि किराणा सोडलं तर नवीन गोष्टी आणणे - नवीन संसार लावणे वगैरे काही नव्हतं .. . just सगळं जपून वापरणं !   आपल्या हातून आल्या-आल्या काही मोडायला नको, असाच विचार !   माझं सगळं काम जरा भीत भीतच ... मोठे दीर आणि जाऊबाई बहरीनला होते , म्हणून घरात 'फॉरीन'च्या वस्तू खूप, त्यामुळे ...