Posts

Showing posts from August, 2026

Glorious ... Superb ... २

      फुलांबद्दल कितीही बोललं, कितीही लिहिलं, तरी काहीतरी राहूनच जातं.   प्रत्येकाची आवड वेगळी, आठवण वेगळी, आणि त्या मागची भावनाही वेगळी !   सगळीच फुलं स्पेशल ... निशिगंध आणि रातराणी, दोन्ही संध्याकाळच्या सुवासाबद्दल प्रसिद्ध, पण किती वेगळी फुलं !  तशीच अबोली - अबोली रंगाची ! पण माझ्याकडे  'हिरवी' अबोली होती !   ह्याला काय म्हणावं ? मी  नुकतीच पिवळी - अगदी हळद पिवळी - अबोली पाहिली, आता जांभळ्या अबोलीच्या शोधात आहे ...!  कोरांटी ... गुलाबी, जांभळी, पांढरी, केशरी ... आणि माझ्या घरी लाल !  जास्वंदीही अशीच.. ..  वेगवेगळ्या रंगात !      ही झाली नेहमी दिसणारी फुलं !    झेंडू - शेवंती  आणि रंगीत शेवंती म्हणावी अशी asters , आपण सणा-समारंभात पहातोच ... आणि कौतुकाने पहातच रहातो ...!      प्रसिद्ध कवी William Wordsworth   एकदा असेच दऱ्याखोऱ्यात हिंडत असतांना त्यांना daffodils च्या फुलांचे ताटवे दिसले, अगदी नजर पोहोचेल तिथपर्यंत ... हवा तेवढा वेळ पहात होते.   नंतर ...

Glorious ... Superb ... !

Image
           काल रात्री  घरी ब्रम्हकमळं फुलली होती.   एका लहानशा झाडाला चार !    तशी दरवर्षी फुलत आहेत. ... अगदी १७-१८ एकावेळी ,  पण फक्त एक जरी फुललं, तरी त्याचा थाट वेगळाच असतो ... संध्याकाळी ते उमलायला लागल्यापासून सगळंच स्पेशल वाटतं ... रात्रीची वेळ,  हवा गार असते, सगळं शांत वातावरण आणि हे सुंदर फूल ... पांढरं शुभ्र आणि मंद सुखद सुवास ... अगदी  pristine, divine   ... त्याच्याकडे नुसतं पाहीलं तरी शांत वाटतं, आणि पहातच बसावसं वाटतं  ! ..." हे खरं ब्रह्मकमळ नाही ... साधं एक पानफुटीचं फूल ... एवढं काय त्यात ... " वगैरे म्हणतात काही लोक ,  पण त्या म्हणण्यामुळे या फुलाचं सौंदर्य कमी होत नाहीच ... !     तशी खरं तर सगळीच फुलं सुंदर असतात ... अगदी घाणेरीचं सुद्धा ... पण अपवाद आहे एक ... Rafflesia  नावाचं फूल.   ते जगातलं सगळ्यात प्रचंड फूल आणि वास म्हणाल , तर न बोललेलंच बरं ... मलेशिया आणि तिथल्या जवळपासच्या देशांतल्या जंगलात उगवतं ... ते सोडून द्या  झालं ...     तर फुल...

भाषा - २

            काल दुपारी सगळी कामं आटपून  रेडियोवर गाणी ऐकत बसले होते ... कार्यक्रमाचा विषय होता बहुतेक 'शब्दाविना भाषा' ... आणि मी ऐकत होते ... आँखों ही आँखोमे इशारा हो गया ... नंतर ... निगाहों निगाहोंमे दिल लेने / देनेवाले ... आणि मग ... पलकोंके पिछेसे क्या तुमने कह डाला, फिरसे तो कहना  ... अहाहा, काय मस्त कल्पना ... न बोलता सगळं बोलणे ... भावना पोचवणे ... हे नयन बोलले काहीतरी ... !     आणि म्हटलं ह्यावर लिहायलाच पाहिजे ... !    भाषा भाषा ती काय, आपले विचार स्पष्ट करते ... पण सगळं तोंडानी बोलायलाच पाहिजे असं नाही, नुसतं समजलं ... नाही समजलं ... confusion नको ... शेवटी communication झालं पाहिजे ... ते भाषेविना, शब्दाविनाही होऊच शकतं ... !     अगदी सगळे प्राणी-पक्षी ... त्यांच्या हावभाव, डोळे, चेहेरा यावरून भीती, राग, हल्ला हे कळूच शकतं आणि त्यांचीच कशाला ... मनुष्यप्राण्यांचीही देहबोली !   भाषेविना, भाषेआधी खूप काही सांगून जाते !   असे विचार मनात भिरभिरत होते ... .     अशी ही भाषेवि...