शास्त्र काय म्हणते ...
भाद्रपद महीना म्हणजे गौरी-गणपतींचे दिवस. सणाचा उत्साह आणि थोडाफार धाकही. एकवेळ गणपती बाप्पा जरा इकडे तिकडे झालं, तर चालवून घेईल, पण गौरींचं सगळं नीट झालंच पाहिजे. त्यात 'चुकीला माफी नाही', ... असा आपला विचार असतो असतो. नुकतीच एका गौरीच्या जेवणाच्या दिवशी बहिणीकडे गेले होते. सगळं साग्रसंगीत, व्यवस्थित ... सर्व नैवेद्य, सर्व उपचार, पूजा अर्चा सगळं नीट आणि वेळेत ! जेवणं झाल्यावर गप्पा !! . .. बहीण हे सगळं करून 'दमणूक' ह्या शब्दाच्या पलीकडे पोचली होती. १६ भाज्या, ५ कोशिंबिरी, ५ पक्वान्नं, तळण पाहिजे, ताटाच्या पूर्ण परिघावर आणि मधे पदार्थच पदार्थ !! मुंगीला पाय ठेवायला जागा नाही अक्षरशः !!आणि आरतीच्या वेळी नैवेद्य, कुठे हातावर ठेवलेला खाऊ , नाहीतर वडी वगैरे तयारी आणि हे जेवण, स्वयंपाक .. आता होत नाही एवढं सगळं, वय झालं ... वगैरे ...मधेच कोणीतर म्हणालं , 'शास्त्र काय सांगतं , ते आणि तेवढंच करावं ' ... आणि विचारांचा नुसता गदारोळ ... माझ्या मनात आ...