Posts

Showing posts from July, 2026

योगासन

      आपल्या पिढीच्या लोकांचा एक आवडता सिनेमा ... आनंद ... त्यातला  एक संवाद ... आपल्या सगळ्यांना पाठ ... जहाँपनाह, हम सब इस रंगमंचकी कठपुतलियाँ  है़ं  ... वगैरे वगैरे ... म्हणजे आयुष्य हे एक नाटक, असा त्याचा अर्थ. पण , माझ्या मते थोडा,  नव्हे खूप फरक आहे दोन्हीत . नाटक हे ३ घंटा झाल्या की सुरु होतं ... आणि आयुष्य हे तिसरी घंटी झाली की थांबतं  ...आणि , या तिन्ही घंटा वॉर्निंग च्या ... !     माझी पहिली घंटा २५-३० वर्षांपूर्वी वाजली ... काहीही ,कसलंही कारण नसतांना ... hypertension ... वारसा हक्कानं   मिळालेलं ... त्यात हार्मोन्स ची उलाढाल, स्ट्रेसची चढाओढ  वगैरेचा अजिबात संबंध नव्हता ... असो.   त्यानंतर वर्षानुवर्षं , अगदी सात आठ महिन्यांपूर्वी पर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं ... आणि अचानक दुसरी घंटा वाजली ... ऑं ?   हे काय ?   आता काहीतरी हातपाय हलवायला पाहिजेत - अक्षरशः - असं वाटलं, आणि तिसऱ्या घंटेच्या आत आपलं नाटक धडपणे उरकायचं असं ठरवलं ...     ... आणि   Habuild जॉईन क...

' आई गं sss '

       कधी कधी मन अचानक नसत्या गोष्टींबद्दल विचार करायला लागतं आणि मग तो विचार जसा काही चिकटून बसतो आत ... तसंच माझं झालं ... facebook उगीच चाळत असतांना एका जुन्या सिनेमाचं नाव वाचलं ... अगं बाई , अरेच्चा.. !   काय मजेशीर नाव  ... म्हणजे कोणाला तरी, खरं म्हणजे कोणा तरी दोघांना कसलं तरी आश्चर्य वाटलं ... बाई म्हणाली  'अगं बाई', आणि दुसरा म्हणाला असेल   'अरेच्चा ! दोन्ही विस्मय बोधक उद्गार ... उत्स्फूर्तपणे बोलले गेलेले ... सिनेमा राहिला बाजूला आणि मग दिवसभर ... अगंबाई आणि अरेच्चा.. अगंबाई, अरेच्चा....!   आपण एखादं गाणं सारखं गुणगुणत राहिलो की त्याला ' earbug ' म्हणतात ... माझ्या मनात हा तसलाच किडा  ... उद्गारवाचकांचा  !      आणि मग दिवसभर त्याच्याच शोधात ... खूप सापडले ... त्यातले काही अगदी घडी घडी म्हणतो आपण ... कधी आश्चर्यचकीत झालो की तोंडात येतात ... काही दुःख, कधी आनंद दाखवणारे, ... कधी राग जाहीर करणारे !   अजूनही तऱ्हतऱ्हेचे   !     अगदी लहानपणी आणि मग खेळतांना वगैरे प...