Posts

Showing posts from June, 2026

अजायबघर

Image
      हिंदीमधे  म्युझियम ला अजायबघर  म्हणतात.   अजब गोष्टी - काही जुन्या, काही खूप जुन्या ... अशा वस्तू जगात होत्या, आणि त्या दररोजच्या जीवनात , किंवा काही स्पेशल कार्यक्रमात लागत होत्या हे खरं वाटणार नाही ... तर अशा आता कालबाह्य झालेल्या अजब गोष्टी जिथे असतात ते  'अजायबघर ' !      म्युझियम म्हटलं की खूप शांतता, अगदी तुरळक लोक, मोठमोठ्या काचेच्या पेट्या - कपाटं आणि त्यात दूर  दूरच मांडून ठेवलेल्या चित्रविचित्र वस्तू  असंच चित्र डोळ्यांसमोर येतं.  एक लायब्ररीत  आणि नंतर वस्तुसंग्रहालयात   (  हो, म्युझियमला मराठीत  'वस्तुसंग्रहालय '  म्हणतात ) मधेच कोणीतरी  " Shh ..." म्हणून सांगतात, जणू काही जोरात बोललं तर तिथल्या वस्तू झोपेतून उठून चालायला लागतील...     मला आठवतं ते पहिलं  म्युझियम  - अजायबघर नावाचंच म्हणजे नागपूरच्या महाराज बागेतलं म्युझियम ... तिथे काय होतं ते काही आठवत नाही, पण नाव मात्र खूप आवडायचं.    दुसरी आठवण म्हणजे सांगलीच्या शाळेच्या लगतच...