Posts

Showing posts from December, 2023

99 Club

       क्रिकेटच्या विश्वात एक खूप special club असतो.    '99 Club' .   आणि खरं सांगायचं तर, ह्या club चा मेंबर व्हायला कोणालाच आवडत नाही.   कारण ही तसंच !    ९९ run   झाल्यावर, खूप जोशात असतांना, century करायची formality च फक्त उरलेली असतांना, सगळ्या जगाचे डोळे आपल्याकडे लागलेले असतांना, तो क्षण दैवाने हातातून काढून घ्यावा  , आणि ह्या क्लब ची मेम्बरशिप मिळावी... ह्यासारखं दुःख नसणार !   आणि त्याबद्दल लोकांच्या comments ही भरपूर असणार ...      आपल्या आजी-आजोबांच्या वेळची /  I mean वयाची माणसं काय म्हणणार ... "अवसानघातकी कुठला .... नेमकं उभं रहायच्या वेळी आडवं होतंय हे ... !!!"    त्या काळी मुली क्रिकेट खेळत नव्हत्या, म्हणून बरंय, नाहीतर ... news येणार ... भरवशाच्या म्हशीला टोणगा !  ( अर्थात शून्यावर out झालं तरी हीच comment ... असो ).    आणि तरुण मुलांची प्रतिक्रिया तर फारच वेगळी ... "अरेरे ,;अजून टिकायला हवा होता ... अजून एकच बॉल खेळायला मिळाला असता तर रे...