पाकसिद्धी - ४
सध्या मी खूप बिझी आहे. धाकटा मुलगा - सून भारतात आले आहेत, घरी रहात आहेत. आणि त्यांच्या न केलेल्या फर्माइशी - त्यांच्या आवडीचे पदार्थ करण्याचा मी चंग बांधला आहे. गेल्या काही वर्षांत, त्यांना काय आवडतं हे मी खरंच विसरले आहे. दोन्ही मुलांच्या आवडी-निवडी दोन टोकांच्या. त्यामुळे ती लहान असतांना, स्वैपाक करतांना काही standard मेनू होते. ही भाजी केली की ती कोशिंबीर ... प्रत्येकाच्या आवडीचा एक पदार्थ ! आता ते आठवत बसते. मागे आपण म्हणायचो, 'साधूसंत येती घरा, तोची दिवाळी-दसरा ...' आता मी म्हणते ' मुलं बाळं येता घरा, तेच सण साजरे करा ..'. आषाढ असो नाहीतर मार्गशीर्ष - काही फरक पडत नाही. त्यांच्या आवडीचे जमतील ते पदार्थ करायचे ! मोठा मुलगा आणि त्याचे कुटुंब weekend ला आले की असंच होतं ... मग तो म्हणतो, "आम्ही दुष्काळातून आल्यासारखं तू करते आहेस ... किती पदार्थ करतेस ... " "अरे, तुम्ही तरुण मुलं ... खा नां जरा पोटभर , आवडीचं ... ...