Posts

Showing posts from November, 2024

कॉफी

      ... लहान मुलांनी चहा-कॉफी प्यायची नसते, त्यांनी माणूस काळं होतं ... ती फक्त मोठ्या  माणसांनीच प्यायची असते ... ह्या पठडीत जन्मलेली मी.    त्यामुळे माझं आणि चहा-कॉफीचं नातं तसं बऱ्याच उशीरा जुळलं ... कधी-मधी कुणाकडे गेल्यावर, अन् ते लोक फार 'चांगले' असले तर मुलांना कधी कधीच कॉफी मिळायची ... तीही अर्धा कप ... त्यातही अर्धं दूध अन् रंगाला थोडीशी कॉफी ... !          मोठेपणी माझा आणि कॉफीचा तसा official संबंध आला तो असा ... लग्नानंतर मी नवऱ्याबरोबर पहिल्यांदाच मद्रास हून बंगलोरला आले होते.  तिथे त्याच्या मित्रांना भेटायला तो मला घेऊन गेला.   मित्र सगळे IISc मधे research करणारे students ... माझं येणं celebrate करायला ते आम्हाला घेऊन इन्स्टिट्यूटच्या कॅन्टीन मधे ! ... आणि समोर आलं ते असं ... एका स्टीलच्या, काठाच्या वाटीत एक उपडं घातलेलं स्टीलचं काठाचं छोटं भांडं ... कपबशी वगैरे काही नाही आणि कॉफीचा थेंब सुद्धा दिसत नव्हता ... यात काहीतरी xxx गिरी आहे ... बहुतेक माझी परीक्षा घेताहेत ... ई. ई. विचार ... मी नुसती...

बकेट लिस्ट

       प्रसादचा आजचा लेख वाचला.   राहून गेलेल्या गोष्टी - अर्थात बकेट लिस्ट - wish list .    आणि मग आपल्या काय काय गोष्टी करायच्या राहिल्या ते पाहूया म्हटलं, म्हणजे अजून काय करायचं  ते ओघानेच येईल ...      तशा आपल्या wish lists सतत वाढत जाणाऱ्या असतात .     तरुणपणी सगळ्या fancy गोष्टी, आपल्याला हव्या तशा घ्यायच्या वगैरे .    पण मला वाटतं त्या फक्त तात्पुरत्या किंवा क्षणिक आकर्षण अशाच !    ती वस्तू फक्त possession म्हणून - त्याचं विशेष अप्रूप किंवा किंमत अशी नसते.    हळूहळू मोठं होता होता, मग जास्त विचार सुरु होतात, आणि मग आपली स्वप्नं, आपली ध्येयं, अशा गोष्टी wish list मधे यायला लागतात.   त्या तिथे किती दिवस रहाणार, आपल्या बिन बुडाच्या बकेट मधून त्या कधी गळून जाणार ... आपले प्रयत्न आणि योग - नशीब अशी भोकं पडणार ... ते वेगळं ...  त्यांचा आणि बकेट लिस्टचा विशेष संबंध ही नसतो.   त्याही पुढे अजून maturity आल्यावर, जगाचा जास्त अनुभव घेतल्यावर, खरी wish list त...

शब्द शब्द

    मला डॉ. शशी थरूर हे गृहस्थ खूप आवडतात.   त्यांच्या पर्सनल आयुष्याशी मला काही देणं घेणं नाही, पण एक अतिशय हुषार आणि भाषेवर प्रभुत्व म्हणजे काय, ह्याचं मूर्तीमंत  उदाहरण !     त्यांच्या मुलाखती ऐकतांना हे खूप जाणवतं !    आणि त्यांचा प्रखर देशाभिमान ही !    पण भाषा हा त्यांचा आवडीचा विषय ... असंच काल एक मुलाखत ऐकतांना वाटलं.    मग मी ही आपल्या नव्या-जुन्या शब्दांचा विचार करायला लागले ... आणि खूप काही सुचत गेलं ... !     सहज विचार करत गेलं, तर कितीतरी शब्दच शब्द.   काहींचा अर्थ माहीतही नसतो पण वापरत असतो, तर काही अगदी almost विसरलेले शब्द !    शब्दांची वर्गवारी करत गेलं  तर , अडगळीत गेलेले - कालबाह्य , काही अगदी 'खास' शब्द ... 'खास' मधे पण आपल्याच कुणाचे तरी आवडीचे शब्द तर काही ठेवणीतले, काही उलट्या अर्थाने जास्त वापरात असलेले, तर काही संपुष्टात आलेले ...! खरं म्हणजे संपुष्ट म्हणजे तरी काय ? ... तर जुन्या काळी रेशमी बासनात महत्वाच्या, खूप rarely वापरल्या जाणाऱ्या किंवा खूप महाग अश...