Posts

Showing posts from December, 2024

स्वयंपाकघर !

Image
    नुकताच WApp वर मैत्रिणीने पाठवलेला vdo पाहीला ... आणि कधी नव्हे ते introspection करावंसं वाटलं ... फार क्वचित येणारा योग ... vdo पाहीला आणि ... खाडकन डोळे उघडले, किंवा डोक्यावर एक टप्पू मिळाल्यासारखं वाटलं ... !   आपण किती स्व केंद्रीत झालो आहोत ... एकीकडे आपण स्वतःला खूप compassionate वगैरे म्हणतो  ... पण काही बाबतीत तितकीशी आस्था दाखवत नाही . तसं पशुपक्षी, झाडं - निसर्ग यावर प्रेम करणं किंवा दाखवणं आता fashionable झालंय .   जो उठतो, तो पर्यावरणाला मदत म्हणून समुद्रकिनारी homestay , कासवं, झाडं, निसर्गरम्य hill stations वगैरे बघायला जातो, कधी त्याला तीर्थयात्रेचं स्वरूप ही देतो, मी ही जाते , पण त्याने खरी मदत होते का नाही , माहीत नाही ...      पण आपण कधी वस्तूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो का ... खरंच ? ....मी पाहिलेला vdo   होता मराठवाड्यातला ... आंबेजोगाईच्या  आसपासच्या गावातला.   तिथे प्रथा आहे की कार्तिक पौर्णिमेला लोकं, विशेषतः बायका-मुली ( तसंही , सगळे सण, प्रथा  त्याच जास्त जपतात ... होळी, दहीहं...

ही वास्तु .....

... जवळ जवळ... ...सत्तरीला आलेली  ...ही वास्तु आता जुनी झाली ...   रंग उडाला , नक्षी पुसली ,  भिंती ,  खोल्यांची , रया गेली  दारं खिडक्या खिळखिळी झाली ,  ...ही वास्तु आता जुनी झाली .... भोवतालची बाग वठली ,  पायाखालची फरशी धसली ,  मुलाबाळांना दूध पाणी दिलं , ती विहीर तर कधीची आटली ,  ...ही वास्तु आता जुनी झाली ... अंगणातलं ते मोठं झाड ,           ते मात्र भक्कम आहे ,           छपराची कौलं उडाली ,          पण त्याची सावली दाट आहे ,            त्याच्या आधारानेच तर ,            ती अजून उभी आहे ...           ...जरी ही वास्तु आता जुनी झाली ...   आल्या गेल्याचं कौतुक केलं ,   कधी कुणाला आधार दिला ...   कुणाचे कधी डोळे पुसले , तर    कधी कुणाचा सांभाळ केला .…       आपल्या परीने ती करत असते        जमेल तेवढं सावरत असते  ...