खजिना
गुढी पाडवा जवळ आला की , मला खूप उत्साह येतो ! घर आवरायचं, पुन्हा एकदा स्वच्छ करायचं ... उत्साहाचं आणखी एक कारण म्हणजे थंडी, गारठा संपतो आणि मी जरा thaw व्हायला लागते. काल तसंच झालं ... आणि माझ्या बरोबर hibernate करणारं माझं पेन - कागद ... सगळेच जागे झाले ... सकाळी नवऱ्याला म्हटलं ... जरा बघ रे, घराचा नुसता कबाडा झालाय ... सगळं काही loft वर ढकलतोय आपण, ते आवरुया ना जरा ...... म्हंटल्याबरोबर शिडी काढून त्यावर चढला , तर तो नवरा कसला ?.... नवरा-बायको complimentary , म्हणजे पूरक ... त्यामुळे मी उत्साहात की , तो ढेपाळलेला ..." हं ... loft पेक्षा आधी जरा पलंगाखालच्या बॅगा आवर नं ... loft उद्या ... !" ..."काय आहे पलंगाखाली ... एक सुटकेस ... त्यात पडदे आहेत . पुण्याच्या नवीन फ्लॅट साठी, दुसऱ्या बॅगेत ... आठवणी ... मुलांचे लहानपणचे काही कपडे ... एक झबलं, एक-दोन स्वेटर्स ... दोन फ्रॉक्स ... हो, मी हौसेनी शिवलेले, आणि ते मुलांना घालून फोटो पण काढून घेतला ... माझी हौस मुलीची ... आणि एक बॅग रिकामी आहे ... "आणि ... तो कुकरचा खोका ?" ... कुकर .....