Posts

Showing posts from April, 2025

Alice in Wonderland

Image
      सिंगापूरला जायचं ... असं दीड वर्ष म्हणत म्हणत, आणि शक्य तितकं पुढे ढकलत ढकलत ... असा दिवस येऊन ठेपला की तिकीट हातात आलं, नव्हे फोन मधे कोंबून पाठवलंच मुलाने ... आणि मग visa ची सव्य-अपसव्य केली.   खरं तर एका फेरीत काम झालं.   रोजची भाजी आणायला सुद्धा २-४ दुकानं पहावी लागतात.   इथे एका travel agent कडे गेलो, त्याने सांगितल्याप्रमाणे 'सस्मित सेवा' करून काहीही खोड - खुसपटं नं  काढता आम्हाला सांगितलं की २ दिवसांत येईल visa आणि तसा आलाही !      मग तयारी !   माझी पहिली foreign trip !   त्यामुळे सगळ्यांचे म्हणजे मैत्रिणी - नातेवाईक - बहीणभावंडं सल्ले सुरु झाले.त्यातले 90 % लोक सिंगापूरला जाऊन आलेले आहेत .   धाकटा मुलगा- ज्याच्याकडे जायचं- तो म्हणाला, "अगं, तुझं नेहेमीचं सामान आण, पुण्याला नेतेस ते,  ....घरात AC 23°C वर  आहे ..." ok, शाल, रुमाल हवा ... ठेवला ... बाहेर कडक ऊन असतं... हे गाव equator च्या 1° N आहे ... बरं, टोपी गॉगल्स, sunscreen ... ठेवलं ... आणि पाऊस कधीही आणि कितीही य...