संध्याछाया भिवविती हृदया ...
बंगलोर मध्ये आल्यावर मला मिळालेली जीवश्च कंठश्च मैत्रीण ...माणिक ... अचानक चार महिन्यांपूर्वी खूप आजारी पडली .. आणि , तिने तिचं शेवटचं मनोगत लिहायला मला सांगितलं ... ते मी लिहिलं ... तिला तिच्या मिस्टरांनी वाचून दाखवलं ... .... तिला जाऊन महीना झाला ... .... तिच्या आठवणीत ... ..... आज नवरात्राचा शेवटचा दिवस ... दिवेलागण झालीये ... आभाळ भरून आलंय ... कधी बरसेल याचा नेम नाही ...काळे कुट्ट ढग ... मनातही विचारांचं काहूर माजलंय ...डोळेही कधी बरसतील , ते सांगता येत नाहीये ...सगळा जीवन पट डोळ्यासमोर येतोय ...डोळे मिटून विचार करतेय .. .. ह्यांना वाटतंय , माझा डोळा लागलाय ... ... नवरात्र आणि कोणत्याही मुलीचा-बाईचा आयुष्याचा प्रवास किती सारखा असतो. खरं म्हणजे संपूर्ण आयुष्याचा fast forward चित्रपट म्हणजे नवरात्रातली देवीची रुपं असं वाटतंय ... एक लहानशी मुलगी ... तिची ओळख कशी तर कोणाची तरी मुलगी-कन्या ... जशी ती 'शैल पुत्री' ... मग मोठं होत असतांना, नवनवीन गोष्टी शिकणारी, शिक्षण ...