शोध



         आव्हान आणि आवाहन  !  तीच व्यंजनं आणि तेच स्वर !  जरा इकडचं तिकडे केलं की दोन शब्द बनतात. पण त्यांच्या स्वभावात किती फरक !  एकाचं दुसऱ्यात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. आपण विचार कसा करतो, ह्यावर ते अवलंबून असते. 

        आयुष्यात अनेक challenges  - आव्हानं आली . मुलांना मोठं करणं , हे पण एक चॅलेंजच असतं . अर्थात ते कोण कसं पेलतं, हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. माझ्यापुढेही असे अनेक चॅलेंजेस होते, आणि माझ्यापरीने मी ते हाताळले. सायकॉलॉजीचा    ' P ' ही  माहीत नसतांना - ( cy  का sy ? ह्यात P कुठे आला ? ) - एकच ठरवलं होतं की मुलांना कोणत्याही गोष्टीचा बाऊ - भीती घालायची नाही. होता होईतो सरळ उत्तरं द्यायची आणि  हाणामारी , शिक्षा न करता वळण लावायचं.      पण कधी कधी पंचाईत व्हायचीच ! मला काहीतरी युक्ती करावी लागायची. अशक्य कोटीतल्या कल्पनाही !

        एकदा एक पाहुण्या बाई आल्या होत्या. सासूबाईंची लहानपणची मैत्रीण. रात्री जेवण झाल्यावर दोघी गप्पा करत होत्या. मुलं आजीच्या मांडीवर लोळत, गप्पा ऐकत, झोप टाळत बसली होती. इतक्यात भिंतीवरच्या एका पालीने आवाज केला. पाहुण्या आजी म्हणाल्या, " अगंबाई, पाल चुकचुकली. आता काय होणार गं बाई ? "  मोठा मुलगा दोन मिनिटांत आलाच. चेहऱ्यावर भीती, काळजी, आश्चर्य, अविश्वास ....  सगळे भाव. " आई, पाल आवाज का करते ? ती ओरडली तर काय होतं ? bad omen आहे का ते ? "  प्रश्नांवर प्रश्न ! शाळेत हे असलं informal शिक्षण फार पट्कन मिळतं ! भुतं खेतं , जादूटोणा, bad vibes वगैरे फार पटकन मुलांच्या मानगुटीवर बसतात. 

        माझ्या डोळ्यासमोरून पापणी फडफडणं, मांजर आडवं जाणं इथपासून ते  " तुम्हारा चेहरा हमारे लिये  lucky  है " , वगैरे सगळं तरळून गेलं आणि मी पटकन म्हणाले, " अरे, ती पाल नं, ती ' चुप  चुप  चुप ' म्हणते,  आता झोपायची वेळ झाली नं ! "सगळे गुप चुप  झोपा असं ती म्हणते ".   क्षणात त्याच्या डोळ्यांतली भीती गेली, आणि तो निर्धास्तपणे पांघरुणात शिरला !

        धाकट्याची अगदी वेगळी गोष्ट ! पण ते ही छोटंसं  आव्हानच !   सारखा खालचा ओठ चावत - चोखत बसायचा.   मानेनी , खुणांनीच सगळं.   नुसतं सांगून, समजावून ऐकेना. मग एक गोष्ट रचली.  " असा सारखा ओठ चावला नं, तर सोंड येते. मग लोकं म्हणतात,  'अरे,  हा तर हत्ती आहे, ह्याला झू मध्ये ठेवा' !"  मग तुला माझ्याजवळ कसं राहता येईल ? " .....  गोष्ट पटली आणि दोन दिवसांत सवय सुटली !

        ही गोष्ट त्याच्या बाबांनी मित्रांच्या अड्ड्यात सांगितली. तेंव्हा एक मित्र म्हणाला, इतके दिवस "  Necessity is mother of invention - गरज ही शोधाची जननी आहे " असं ऐकलं होतं.   पण  नुकतंच  Readers' Digest च्या Quotable   Quotes मध्ये वाचलं, " Invention  is necessity of mother - शोध ही जननीची गरज आहे ". 

  ..... पटलंच मला ! ..... 

Comments

  1. खरेच एक आई च असे उत्तर देऊ शकते

    ReplyDelete
  2. आईच्या कल्पकतेने सलाम!
    अतिशय सुरेख.
    सविता

    ReplyDelete
  3. Niranjan Joshi23 July 2021 at 23:39

    Wonderful! Greatly enjoyed! Thanks very much. Will look forward to the next one.

    ReplyDelete
  4. कल्पना करत पटवणं कठीण काम
    सोपं करणं आईची किमया

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland