Posts

Showing posts from October, 2022

दिवाळीनंतरची पहाट ...

      छान गार हवा, मऊ मऊ रजईमध्ये मी मस्त गुरफटून झोपले आहे.  अजून सकाळ होते आहे.  आनंद सिनेमातल्या कविते सारखं, ... दिन अभी पानीमें हो, रात किनारेके करीब  ... , अर्धवट जाग, अर्धवट झोपेत मी, कालचं सगळं डोळ्यासमोर आहे ....  सुंदर कपडे, दागिने, ... सगळीकडे चमचमणारे दिवे अन फटाके, गप्पाटप्पा, हसणं, दंगा, ...  फराळाच्या पदार्थांची चव अन वास ...      आणि मला खडबडून जाग  येते. तळणीचा वास नाकात भरलाय, नी फटाक्यांचा धूर ही ! ... जसं मावळत्या दिनकराचं कोणीच कौतुक करत नाही, तसंच या दिवाळीनंतरच्या पहाटेचं  .... कारण ही तसंच ! दिवाळीचा ' hangover' असतो नां ! ... आता आवरासावर म्हणजे डोकेदुखी ...?      दिवाळी जशी बायकांना चढते म्हणजे स्वच्छता, फराळ, खरेदी ... तशी घरात कोणालाच चढत नाही.  आणि साहजिकच, तिचा hangover ही बायकांनाच सर्वात जास्त !       ... रजईतून बाहेर निघू का नको, असं वाटत असतांनाच माझ्या डोळ्यांसमोर घरातला scene नाचत असतो ...      तळणीच्या वासावरून स्वैपाकघर आठवतं ... ...

एका मुलाची कैफियत

        आजी - आजोबा, आई - बाबा,  आत्या, मावशी ... सगळ्यांनाच हे पत्र .      आज मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं  आहे. माझी कैफियतच मांडायची आहे म्हणा नं.   काल रात्री तुमच्या सगळ्यांच्या - मोठ्या माणसांच्या गप्पा मी ऐकल्या.   चोरून.   तुम्ही तुमच्या लहानपणच्या आठवणी काढत होता, पण खरं म्हणजे मुलांना नावं ठेवायचा तुमचा कार्यक्रम असावा असं वाटलं ...      'आजकालची मुलं'  हा विषय असल्यावर दुसरं काय असणार ?   ती उध्दट आहेत, बेदरकार आहेत, स्वार्थी आहेत, त्यांना काहीही माहीत नसतं, कशाचीही आवड नाही, कसलाही ध्यास नाही , नकार पचवायची ताकद नाही ,    जे जे वाईट आहे ते सर्व ह्यांच्यात आहे - नव्हे तुमच्या भाषेत 'पाचवीलाच पुजलेलं' आहे ... अगदी खरं आहे ते.   पण ते तसं का आहे ह्याचा विचार तुम्ही केलाय का कधी ?     मी जन्मलो तेव्हा नक्कीच इतका वाईट नव्हतो.   मग असा कसा झालो ?   तुम्हीच वळण लावलंत नं मला.   का लावलंच नाहीत ?   माझ्या आवड...