Reunion - Finale
२० नोव्हेंबर . Reunion , शाळेचं get-togethe r, पुनर्भेट ... कोणतंही नाव द्या, ते एक gathering च होतं ! आणि gathering म्हटलं की सगळ्या मुला-मुलींचं कला-प्रदर्शन ही हवंच ! शिवाय awards , medals, trophies आणि कलाकुसर, भरतकाम, साखरेच्या वस्तू .... ! हे सर्व मांडायला शाळेनी २ - ३ वर्ग रिकामे करून दिले होते. एवढंच नाही , तर आपल्या दोन मित्रांच्या सुविधेसाठी यंदाचा कार्यक्रम ग्राउंड मधे शामियाना घालून केला. गेली काही वर्षं हा कार्यक्रम तिसऱ्या मजल्यावरच्या हॉलमधे करत होते. खरंच , शाळेचं कौतुक करावं तेवढं थोडंच ! गावांत राहणारी आणि जरा दोन दिवस आधी आलेली मुलं मुली गोष्टी मांडायला झटत होती. "माझं चित्र इथे लावायचं" इथपासून ते " कशाला? अरे ,लावण्यासारखं आहे का माझं चित्र ?" इथपर्यंत, सगळं चालू होतं. शाळेतली काही मुलं मदतीला होतीच. .... " ए जा, आमचं कोणी लावतच नाहीये ... कधीची बसलेय मी इथे ..."... "कधीची वगैरे काही नाही, आत्ता दहा मि...