मालगुंड ट्रिप
"काय ? येणार का ट्रिपला ? जायचं कोकणात ?" ... सतीशचा फोन आला आणि मी चकीत !! एका पाठोपाठ एक धक्के ! एकतर सांगलीहून सतीशचा फोन, ट्रिपला येतेस का , विचारायला, ती ही कोकणात ! "येते की... " म्हटलं आणि तयारीलाच लागले ! ३ महिन्यात पुन्हा GT ! ... मालगुंड आणि गणपतीपुळ्याला जायचं ठरलं ! आणि मग planning सुरु ! GT सारखंच ! रोज रात्री कामं धामं आटोपली की फोनवर फोन ... मी हे आणते, त्याला ते आणायला सांगू, अमका हे करेल, तो ते करेल ...नव्हे ...केलं , झालं ,असंच ! ... सतीश आणि अनील ! दोघे सगळ्यांसाठी एक पायलट ट्रिप करून आले ! दोघे सगळं बघून, शोधून आले ! त्यांनी पाठवलेले फोटो आणि VDO अप्रतीम ! मुळात , हे सर्व आपल्याच देशात, नव्हे, आपल्या महाराष्ट्रातच आहे, हे पाहून तर इतकं छान वाटलं ! झक मारत गेले जगभरचे समुद्र...