Posts

Showing posts from April, 2023

Biological Warfare

      काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे.   भाचा  आणि फॅमिली पाहुणे आले होते.   त्यांची चौथी-पाचवीतली चुणचुणीत मुलगी - माझी नात !      अर्थातच मावशीआजीची लाडकी !     ह्या वयाच्या मुली म्हणजे एक अजब रसायन असतं.   शिंगं हळूहळू फुटत असतात, अन् नको ते  'ज्ञान' नको तितकं वाढत असतं.      पण ते पचवायची अक्कल आलेली नसते ... मोठ्यांच्यासारखं वागणं - बोलणं ... पण काहीतरी गडबड होतेच !          तेव्हाच एक दिवस मैत्रिणीचा नातू शाळेच्या अभ्यासाच्या शंका विचारायला आला होता.    मी त्याला सांगत असतांना ही जिन्यात बसून सगळं ऐकत होती.   Chemistry सांगतांना आमचं laughing gas,  chloroform वगैरे चालू होतं.    जाताजाता nerve gas चा पण उल्लेख झाला.    आपण काय शिकतो, त्याचा संबंध रोजच्या व्यवहारात, जीवनात, जगाच्या संदर्भात काय ते कळावं म्हणून मी काहीतरी सांगत होते.         ते शिकवतांना   chemical, biological warfare...