Posts

Showing posts from May, 2023

ठकी ते बार्बी - एक प्रवास

           माझा सांगलीतला वर्गमित्र, प्रसाद जोग लिहीत असतो.  मोठी व्यक्तिमत्वं हे त्याचे विषय.  किंबहुना तो कशावरही लिहू शकतो, आणि ते ही अभ्यासपूर्ण - तारीख वार आणि व्यवस्थित संदर्भासहित.  त्याने आज बार्बी ह्या बाहुलीच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर लेख लिहिला WApp वर !  ती कशी अस्तित्वात आली, प्रसिध्द झाली आणि मग जगभर नुसती घराघरात पोहोचली असे नाही, तर त्यांचा अविभाज्य भाग बनली , असं !   ते वाचतांना स्वतःच्या नकळत, मी कधी  माझ्या बालपणात पोहोचले ते कळलंच नाही.  आताशा, मी जास्त तिथेच रमत असते ,असं मला वाटतं !     बाहुली म्हटलं की पहिली बाहुली म्हणजे  'ठकी'च !  माझ्या वयाच्या बहुतेक सगळ्यांच मुलींकडे ती असायची.  त्रिकोनी असा cross-section,   आणि ८ - १० इंच उंच !  पिवळा, लाल, निळा , हिरवा  सगळ्या रंगात रंगलेली !  ती कधी, कशी, आली ते माहीत नाही, पण आता आठवते ती जरा रंग उडालेली आणि तरीही माझ्या खेळात सामील झालेली ! ... नंतर ती कुठे गेली तेही आता आठवत नाही !      त्...