Posts

Showing posts from June, 2023

अभिमन्यु

       काही दिवसांपूर्वी नातीबरोबर walk ला गेले होते.  तर चालता चालता , एक प्रश्न आला, "आजी. 'catch them young' म्हणजे काय ?"   "हे ... कुठे वाचलंस ? सांगते  हं, 'catch them young' म्हणजे .." "कोण पळालं  , कुणाला पकडायचंय ?"     ... आणि ती phrase   मनात नाचायला लागली.   ' catch them young'  म्हणजे उघड आहे, मुलांच्या करता कसल्या तरी 'entrance   class' ची जाहिरात असावी ... पण , मग ते पळून चालल्याची भावना ?...  'catch' शब्दामुळे ! जाहिरातदारांना 'उशीर व्हायच्या आत' म्हणायचं असेल ... पण इतकी घाई ... 'rat race' join करायची ... ! कारण,  जरा जवळ जाऊन पाहीलं, तर ती जाहिरात    LKG - UKG च्या क्लास साठी  होती, त्यांना ABCD लवकर यावं, हाताचा control लवकर यावा म्हणून,    cognitive abilities  develop करण्यासाठी , आणि संध्याकाळी संस्कार वर्ग ... !!   मी थक्क झाले.... मग आई-वडील काय झक मारताहेत घरी ?  आणि मग मादाम मॉंटेसरी  काय म्हणत होत्या बरं...

सखा

एक मित्र  ..... सगळ्यांना असावा ,  काळा-गोरा ...  उभा-आडवा  ... ... कसाही दिसावा, लहानपणी,                                              आपण शाळेत पोचल्यावर, धावत समोर येणारा, आपला हात धरून, वर्गात बाकापर्यंत पोचवणारा, हात पाठीमागे बांधून, सरांच्या स्टाईलमध्ये,          'उशीर का झाला ?' म्हणून विचारणारा, आपण वाढदिवसाला दिलेलं चॉकलेट...                                                                                    'तू खा' म्हणत मधल्या सुट्टीत परत देणारा, पण, त्याला न देता आपण बोरं खाल्ली,                तर मात्र चिडून रुसून बसणारा, स्वतः मित्रांबरोबर हुंदडणारा ,    ...

कोणावर राज्य ?

    काही महीन्यांपूर्वी,  कोविड वगैरे संपल्यावर एका छानश्या ट्रिपला जाऊन आले.  खूप वर्षांनी बाहेर पडल्यासारखं वाटत होतं.  सुंदर ठिकाण आणि टुमदार homestay   ... म्हणजे खरा खरा homestay !   सुंदर स्वच्छ खोल्या, मोठा व्हरांडा आणि अंगणात उतरणाऱ्या पायऱ्या.  वरच्या पायरीवर बसून मी तिथली बाग, झाडं, फुलं ... अगदी गवत आणि काड्याकुड्या सुध्दा डोळ्यांत आणि मनात साठवत होते.      अचानक कुठून तरी फुलपाखरं उडत यावीत, तश्या २ - ३ छोट्या मुली आल्या.  "नमे, ए  नमे ... " अशी हाक मारताहेत तोच आमच्या homestay च्या मागच्या बाजूने  'नमी'  आलीच !  बघता बघता  ६ - ७ जणी जमल्या.  बडबड ... बडबड ... "काय झालं नं  ... "  जोरजोरात हातवारे  करत बोलणं !! ...         मी गंमत बघत होते , .."आजी, आम्ही इथे खेळू ?"    "हो, अगं तुमचंच घर आहे नां ... खुशाल खेळा."        "तुम्हाला त्रास नाही ना होणार ?"     "छे छे,  काही नाही. ...