कुरकुर करायची नाय ... २

         कोणीतरी वाढदिवसाला virtual फुलं आणि best wishes नी WA भरून जातं , म्हणून कुरकुर केली ...मग मी लिहून टाकलं ...

बास झाल्या शुभेच्छा,  बास झाली फुलं ....???.

असं नाही का वाटत, की तुझंही काहीतरी चुकलं ?

    सांग मला, किती जणींना घरी जाऊन भेटलीस,

  चहा - बिस्किटं खात, मनमुराद गप्पांत रमलीस ?

       नेहमीच्या घडामोडीत, गप्पांना वेळ नाही,

       रोजच्या रडगाण्यात, हसायला वेळ नाही. 

      रस्त्यातला ट्रॅफिक, कुठे जाऊ देत नाही,

      चिंता आणि कटकटी, कुणाशी बोलू देत नाही. 

खरं खरं जाता आलं नाही, तर खोटं खोटं तरी जावं,

मिठी मारता आली नाही, तरी WhatsApp वर             भेटावं

खरी माणसं दिसत नाहीत  , त्यांना व्हीडिओत तरी             पहावं,

कार - बस - विमान नको,  मनानीच तिथे जावं , 

आनंद किंवा दुःख,  कुणाशी तरी बोलावं,

मनात आलं ते, कुणाला तरी सांगावं. 

    माझ्या मनातलं, माझ्या माणसांना पोहोचावं,

     आत्ता वेळ नसेल, तर त्यांनी नंतर तरी वाचावं.  

हवं त्या क्षणी, मी त्यांना गाठावं,

त्यांनी मला शोधलं, तर मी ही त्यांना सापडावं !!

       इतका सुंदर WhatsApp, इतकं सुंदर facebook,

       चांगला उपयोग केला, तर दुसरं काय सुख ?

सगळी सुंदर फुलं, सगळ्यांच्या हार्दीक शुभेच्छा,

अशाच येत राहोत, हीच एक सदिच्छा !


Comments

  1. वाह् वा ! किती सुंदर कविता किती सुंदर इच्छा ! त्यांनी मला शोधलं तर मी त्यांना सा पडावं ! 👌👌👌💯💯

    ReplyDelete
  2. अगदी खरं.! Internetनंएवढा बदल झाला आहे.आठवण झाली ..जगाच्या पाठीवर कुठेही असो,तुमच्या भावना पोचवता येतात.शुभेच्छा केवढ्या सकारात्मक भावना घेऊन येतात....

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद संजू , मला हे इंटरनेट , सगळं आवडतं , खूप ! आपलं जग आपल्या जवळ असल्यासारखं वाटतं ..

      Delete
  3. total world is now very small, we must enjoy all

    ReplyDelete
  4. धनंजय चौगुले8 November 2023 at 12:34

    मला तरी वाटत की आभासी फुलं, रंगीत असली तरी, किंवा एकसाची वाक्य वाचण्यात आनंद/ मजा आहे. दिवसभरात 5/10 मिनटे फोन करून बोलण्यास कोणाला वेळ काढता येत नसेल तर कसला जिव्हाळा अन् भेटीची हुरहुर,?? तस तर कंपन्या, विमा कंपनी, अलिकडे बॅंका सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवित असतात. यातील रूटीन आपण समजू शकतो. पण नात्यात, मैत्री मध्ये डायरेक्ट फोन हाच सर्वोत्तम योग्य मार्ग.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland