दिवाळीची तयारी
दिवाळीची तयारी म्हटलं की माझ्या पोटात गोळा येतो. खरं म्हणजे बरेच येतात ... कुरुक्षेत्रावर अर्जुनाची झाली , तीच परिस्थिती , फक्त कोणी 'कृष्ण सखा' येऊन समोर ठाकत नाही. खरं म्हणजे नवऱ्याला 'सखा' म्हटलं, तर तो असतो समोर, पण आपण त्याला गोवर्धन गिरीधारी role मधे पहात असतो, आणि कुरुक्षेत्र म्हंटल्यावर तो गीता सांगत असतो ... तू तुझं काम कर, फळाची - कौतुकाची इच्छा किंवा अपेक्षा करू नकोस ... !!! तर दिवाळीची तयारी ! .... स्वच्छता, डबे घासणं उरकलं .....रांगोळी, दिव्यांची माळ, आकाश कंदील, ... की actual चक्रव्यूहात माझी entry ... फराळाचे पदार्थ !!! ... कसे करायचे ते माहीत आहे, पण end result . .. ? त्यातून मी कशी बाहेर पडीन ... सहीसलामत , यशस्वी होऊन का धारातीर्थी पडून ... ? लाडू-शंकरपाळे ... ok, चिवडाही ok , ... पण चकलीचं आणि माझं पटत नाही. एकवेळ चकल्या होतील, पण मग फराळाला आलेली मंडळी ... ... 'अमकीची चकली मऊ, तमकीचे लाडू जरा बसले, असं बो...