दिवाळीची तयारी


      दिवाळीची तयारी म्हटलं की माझ्या पोटात गोळा येतो.   खरं म्हणजे बरेच येतात ... 

     कुरुक्षेत्रावर अर्जुनाची झाली , तीच परिस्थिती ,  फक्त कोणी 'कृष्ण सखा' येऊन समोर ठाकत नाही.   खरं म्हणजे नवऱ्याला 'सखा' म्हटलं,  तर तो असतो समोर, पण आपण त्याला गोवर्धन गिरीधारी  role मधे पहात असतो, आणि कुरुक्षेत्र म्हंटल्यावर तो गीता सांगत असतो ... तू तुझं काम कर, फळाची - कौतुकाची  इच्छा किंवा अपेक्षा करू नकोस ... !!! 

 तर दिवाळीची तयारी ! .... स्वच्छता, डबे घासणं उरकलं .....रांगोळी, दिव्यांची माळ, आकाश कंदील, ... की actual चक्रव्यूहात माझी entry ... फराळाचे पदार्थ !!! ... कसे करायचे ते माहीत आहे, पण end result ... ?   त्यातून मी कशी बाहेर पडीन ... सहीसलामत ,  यशस्वी होऊन  का धारातीर्थी पडून ... ?    लाडू-शंकरपाळे ... ok,  चिवडाही ok , ... पण चकलीचं आणि माझं पटत नाही.   एकवेळ चकल्या होतील, पण मग फराळाला आलेली मंडळी ... ... 'अमकीची चकली मऊ, तमकीचे लाडू जरा बसले, असं बोलायला लागले की माझा तुकडा पडतो ... खाता ते खाताच, वर नावं का ठेवता ? ... माझे पदार्थ तुम्हाला आवडले नसतील, पण तुमचे तरी कुठे मला आवडतात ?    फरक एवढांच, ... की मी गप्प बसते !!!      गुपचूप खाते ... नावं न ठेवता ... !

    असो, तर चकली, चिवडा, शंकरपाळे, ... done  ... अनारसे ... ?   ते मऊ असणं चांगलं की कुरकुरीत असणं चांगलं ?    ते पुऱ्यांच्या group मधे धरायचे,  का करंज्या - चिरोट्यांच्या ... नुसते प्रश्न !... मी लहान असतांना,  शाळेतली एक मैत्रीण  'कडाकण्या' नावाचा  पदार्थ आणायची !   नावाप्रमाणे कुडकुडीत, वर साखर पेरलेली.  खातांना त्याचा आवाजही छान यायचा आणि चव तर गोडच !   नंतर कधी खाल्ला नाही !    तो खरंच नवीन पदार्थ होता ... का  innovation ... का one time wonder ... तिची आईच जाणे ... ! ...   शेव - कडबोळी second class पदार्थ ... असले तरी वाहवा, नसले तरी वाहवा !    so,  फराळाचं झालं !

      आता दुसरा गोळा म्हणजे gifts काय आणायच्या ?   इतक्या वर्षात सगळं देऊन झालंय, आणि imagination limited , त्यामुळे thinker's block सदैव डोक्यात !   आता मैत्रिणी ही इन मीन तीन.   त्यातली एक परदेशात, दुसरी मुलाकडे दिवाळीला आणि तिसरी बोलेचि  ना !   म्हणजे तिची  मुलगी जावई आलेत ...!   म्हणजे कोणालाच वेळ नाही.   आपण नेहेमीच last priority !   आधी staff ... त्यांना खूष  ठेवायलाच पाहिजे  ... मग घरची माणसं - मुलंबाळं, नातेवाईक,पाहुणे ... आणि मग friends ... जे काही mind करत नाहीत ... काहीच !    गिफ्ट द्या, देऊ नका, आठवण ठेवा, ठेवु नका, ते बिनधास्त ... आणि समजून घेणारे ..." अरे, चलता है, नंतर दे म्हणे ... "   असं म्हणणारे.   So, त्यांचं  नंतर बघू ! ... आणि मुलांना 'cash'  ... !   हे घ्या आणि त्याचं काय वाट्टेल ते करा !   कपडे आणा ... icecream खा ... काहीही करा ... !     आणि save केले तरी ... ते piggy bank ला शोभतील असाच amount  !   माझ्या डोक्याला ताप नको ... ऐष करो, खुष रहो !

  आता तिसरा गोळा म्हणजे , actual दिवाळी ... आज धनत्रयोदशी !   म्हणजे दिवाळी आलीच की  घरांत !   आज काय पदार्थ ?   श्रीखंड - बासुंदी, ... पोळ्या का पुऱ्या ?   मसालेभात का पुलाव ... का आणखी काही  ?   उद्या काय ?   ते ही ठरवायला हवं ... स्वैपाक करता करता, डाव्या उजव्या हाताने वड्या, कडबोळी उरकली पाहिजेत ... करंज्या उद्या.... चिवडा नंबर दोन ... परवा,  ... थोड्या चकल्या परवाकरता बाजूला काढून - खरं तर- लपवून ठेवायला हव्यात, ... gift द्यायला निदान पाकिटं शोधून ठेवायला हवीत,  वाती करायला हव्यात,  पणत्या paint करायच्या होत्या, पण बघू ते ... पूजेची उपकरणी नीट लखलखीत करायला हवीत, दर दिवशीची साडी, तिला इस्त्री ... काय काय करायचंय ... आणि ही कामं म्हणजे ...            " केल्याने होत आहे रे ... आधी केलेची पाहिजे ..." असं ... !

To be honest  ... माझं यातलं काहीही झालं नाहीये, ... मग इतका वेळ काय करत होते ? ... मी कामांच्या  lists  करत होते ... general कामांच्या, रोजच्या कामांच्या, वगैरे,  वेगवेगळ्या heads खाली ... !    कारण माझ्या मते सगळं organize करणं, कामं वाटून देणं, lists करणं हे फार महत्वाचं आहे ... एकदा lists झाल्या ... की  half the battle is won ... !!!

तर,  अर्जुना , तुझं कुठे चुकलं,  ते मला कळलं ... !    मला तुझ्यासारखं 'सीदन्ति मम गात्राणि, मुखं च परिशुष्यति'  असं होत नाही !!     कारण मी lists करते !!!  बरं का ! ....मग त्यात खूप वेळ गेला तरी बेहत्तर .....





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland