बादशहाचा पोपट
नुकताच पेपरात एक लेख वाचला. नाव, विषय काहीतरी होतं, पण सगळा लेख अगम्य भाषेत लिहिलेला. मोठे मोठे शब्द आणि लेखाशी संबंध नसणारी अवतरणं, उदाहरणं आणि वाक्प्रचार लिहून सजवलेला , पण स्पष्टपणे माणूस बोलेच ना . मूळ विषय कळेल, तर ना ! विनोदी - 'हलकं फुलकं' - लिहिलं तर २ क्षण हसायला तरी येतं, इथे तर सकाळी सकाळी बिनसाखरेचा चहा प्यायल्यावर होतं , तसं तोंड झालं ... असो ... आत्ता मी ही तेच करतेय ना ... असो मुख्य विषय असा ... बादशहाचा पोपट ... ! लहानपणी आपण सर्वांनी ऐकलेली गोष्ट ... आणि आता नातवंडांनाही सांगून झालेली ! तिचा प्रत्यय आजकाल फार म्हणजे फारच वेळा येतोय . मुलं लहान असतांना त्यांना ही गोष्ट सांगितली होतीच की , कसा अकबर बादशहाचा पोपट पडला होता ..आ वासून ..उताणा पडलाय , डोळे बंद आहेत , हलत नाहीये , बोलत नाहीये वगैरे ....पण बादशहा सुळावर देईल म्हणून कोणी स्पष्ट बोलेना की तो मेला आहे ....!. ...तर, मुलं लहान होती , तेव्हा बहुतेक - नव्हे तेव्हाही बहुतेक - मी जरा terro...