नववर्षाभिनंदन
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! तसा एक आठवडा उलटला आहे , पण जसा सगळ्या सणांचा - उत्सवाचं नवरात्र किंवा सप्ताह चालू असतो, तसाच हा ही ... असा मी विचार केला ... केला गेला ... खूपदा आळशीपणा करण्यात आपल्याला खूप विचार सुचतात ... ! त्यातलाच हा एक ... !
नवीन वर्ष ... ! नवीन आशा, उत्साह, आणि नवीन ideas पण ! नुकतीच एक पोस्ट वाचली ... नवीन वर्षाला त्रिवेणी संगम ... ! फारच मस्त ... ! गंगा - यमुना - सरस्वती ... ! सरस्वती गुप्त ... ! पण ती असणार ... असायला पाहीजे ... ती असतेच !... पण , मला का नाही सुचली ही idea ? तसं नवीन वर्ष आणि नवीन महीना हा संगम असणारच, पण त्यात सोमवार ! नवीन आठवडाही सुरु ! छान idea ... त्रिवेणी संगम ... !
मग आपल्या संकल्पांचाही त्रिवेणी संगम का नसावा ? मग खूप त्रिवेणी संगम - संकल्प सुचत गेले ... ! व्यायाम करायचा, walk ला जायचं ... मग काहीतरी छानसं diet करायचं ... खरं तर diet आणि छानसं हे combination पहीले दोन-चार दिवस जमतं ... मग कळतं की , 'हे possible आहे' असं म्हणणारे लोक थापाडे आहेत ... किंवा तेवढा वेळच नसतो आपल्याला !!! आणि तिसरी गोष्ट म्हणजे घरातला कचरा कमी करणं ... पूर्ण कचरा कधीच निघणार नाही ... कारण 'कचरा' हा शब्द 'सापेक्ष' - subjective आहे. माझ्या नवऱ्याला माझे मणी-टिकल्या, दोरे-लोकर-सुया ह्या वस्तू कचरा वाटतात ... आणि तो स्वतः जुने स्क्रू - नटबोल्ट - वॉशर, लाकडाचे छोटे तुकडे, जुन्या wires जपून ठेवतो ! तो मात्र कचरा नसतो ... ओघ भलतीकडेच चाललाय ... संगमाचा ... !!! असं ठरलं आहे की , जर आपल्याला गुण्यागोविंदाने राहायचं असेल , तर एकमेकांच्या (या) भानगडीत पडायचं नाही ! त्यामुळे घरातला कचरा काढणे ही idea सुरु व्हायच्या आतच 'समाप्त' !
जरा चांगलं resolution करावं. जमेलसं, पटेलसं. कुणाला तरी विचारावं ... एक मैत्रीण गाठली ! ती म्हणाली, 'अगं , रोज एक सत्कृत्य कर .' ... सत्कृत्य म्हटलं की मला स्काऊट - गाईड ची आठवण येते ... ! लहानपणी हे एक असायचं !!! तेव्हा, मैत्रिणी भेटतील म्हणून मी त्या ग्रुपमधे join झाले. त्यांची प्रतिज्ञा वगैरे जरा ok - ok च वाटायचं, पण नंतर खेळायला मिळायचं. पण मग लवकरच 'brain-washing ' सुरु झालं ... 'रोज एक सत्कृत्य करा' ... मला प्रश्नच प्रश्न ! बोलण्याचा 'पोचपाच' हा शब्दच आपल्या dictionary मधे नसल्यामुळे, सरळ भर assemblyत विचारून टाकलं ... "पण बाई, मी वाईट गोष्ट कधीच करत नाही, ... मग सत्कृत्य ओळखायचं कसं ... ?" बाई रागावल्या , "नंतर बघते तुला " ... म्हणाल्या ... त्यांच्या आवाजावरून कळलं की हे आपलं 'सत्कृत्य' मुळीच नव्हतं ... म्हणून खेळणं झाल्यावर तिथून जी पळाले, ते अजून तिथे गेलेच नाहीये ... पण अजूनही सत्कृत्याचे parameters समजले नाहीयेत ... exactly काय असतात ते ... एकूण काय ... नन्ना रे नन्ना रे नन्ना ... !
असाच एक किस्सा आठवतोय ... जुनी गोष्ट आहे ... ह्याच मैत्रिणीकडे गेले असतांना तिथे तिसरी मैत्रीण पोहोचली. मुलीच्या लग्नाच्या साड्या वगैरे shopping करून ... ! आणि , मला एक idea सुचली ... दर महिन्याला एक साडी आणावी का ? जुन्या त्याच त्याच साड्या, काही विटल्या आहेत, जरीची चमक कमी झाली आहे, डिझाईन जुनं झालंयं, ... काही 'उभ्या' जाताहेत ....दर सणाला नवीन काय नेसावं, हा प्रश्न सुटला.. आणि, एक नवीन आणली की एक जुनी मोलकरणीला ...सत्कृत्य ! ... ती ही खुश, मी ही खुश ... ! मैत्रिणींनी दुजोरा दिला ... "आणि बुधवारी आण हं नवी साडी ... म्हणजे बुदु बुदु साड्या घेशील किंवा मिळतील ! Idea 'भावली'च ! ('भावली' ला खूपच 'भाव ' आहे आजकाल ! समजलं, पटलं, आवडलं वगैरे बऱ्याच shades) ... नवऱ्याशी चर्चा केली, तो म्हणाला "साड्या बुदु बुदु पडतील ..पण त्या कपाटातून ... ! कारण 'आणणं' होईल, पण 'देणं' होणार नाही !" .... नंतर जरा शांतपणे बसून ही idea, आणि आपल्या पर्सची reality तपासली, तेव्हा ह्या त्रिवेणी संगमात आपली 'सरस्वती' लुप्तच होती हे लक्षांत आलं !!! एकूण काय idea नापास !
मग काय करू ? खरं म्हणजे 'सत्कृत्य' ह्या नावाखालचा प्रत्येकच item आपण नाईलाज, कर्तव्य,आवड, हौस, प्रेम, कल ... अश्या अनेक नावांखाली करतोच आहे , करत असतो ! पण , नवीन काय ?...
अनेक संकल्पांपेकी व्यायाम, योगासने, आणि diet ह्या विषयांचं पुरेसं चर्वित-चर्वण होऊन चोथा झालाय, तेव्हा ते नकोच ! Morning walk ? थंडीत अशक्य ... उन्हाळ्यात ... रात्री उकाड्यामुळे झोप लागत नाही ...झोप पूर्ण नको व्हायला ?....पावसाळ्यात ... चिकचिकाट - रबरबाट ... रस्त्यावर फिरायलाही जाता येणार नाही. मग इतक्या लवकर उठून करायचं काय ? एकूण काय ... वाट लागली 'त्रिसूत्री'ची का त्रिवेणीची ..
तशा आहेत काही गोष्टी करण्या सारख्या ... म्हणजे इतकी वर्ष न करता आलेल्या ... काही कारणांमुळे, मुलं लहान असतांना , संसार करतांना, कामाच्या रगाड्यात ... काही हौशी-मौजी राहील्या आहेत ... काही promises, वचनं पुरी करायची आहेत , थोडी फार वसुली आहे! ... दात आणि चणे ह्यांची भेट आता शक्य झाली आहे ... इतरांना, मित्रमंडळींनाच नव्हे तर स्वतःला promise केलेल्या गोष्टींची list ही बरीच मोठी झाली आहे ... तिला कोणी आता bucket-list म्हणतील ही ... पण तेवढी वेळ आली नाहीये ... दात शिल्लक आहेत, चणे पुरेसे आहेत, तोपर्यंत खाऊन घ्यावे ... !!!
इतके दिवस खूप अन्याय केला स्वतःवर, खूप बंधनं होती ... बरीच आपणच घालून घेतली होती . काही मनाने , काही कुटुंब,समाज वगैरेंनी घातलेली ... आता ती सगळी झुगारून द्यायची ... जे वाटेल ते स्पष्ट बोलायचं, जे हवं ते खुशाल करायचं, हवं ते अनुभवायचं, स्वतःला खूष ठेवायचं ... कोणी - खरं म्हणजे कोणीच - काही म्हणत नसतं ... ते आपलंच मत असतं ... आपल्या दुसऱ्या भित्र्या मनाचं ...स्वतःवर लादलेलं !!!
त्या घाबरट मनाला गप्प बसवायचं ... ! जे काही उरलं सुरलं आयुष्य असेल ते मनाजोगं , मनसोक्त जगायचं ... !! हाच माझा संकल्प ... new year resolution !!!...
चला, आता बंद करते, आणि , मित्रांना फोन करते ... ट्रीपला जायचं का कुठेतरी ... sightseeing नाही ... केवळ गप्पा मारायला, हसायला, खेळायला, गायला, हवं तसं अन् येईल तसं नाचायला...बोला..येताय...??
Even I say YES to your last ? it remains again resolution which cant be ******
ReplyDeleteYes , Sure ! Next trip , surely will tell you !! Do join !!!☺️
ReplyDelete