रंगात रंगुनी साऱ्या ...
आजपासून वसंतोत्सव ! इतके दिवस शांत शांत असलेली सृष्टी पानापानातून डोळे उघडतेय... आणि फुलाफुलातून जागी होतेय ....वसंत अवतरतोय आणि त्याच्या स्वागताला आलेली ही सणांची जोडगोळी ... ! होळी आणि रंगपंचमी ... एका पाठोपाठ येणारे हे आवळे-जावळे सण . सर्वांचे लाडके. पूजा-पाठाच्या फारसं आहारी न जाता, दंगा-मस्ती, मौज-मजेवर भर ! लहान-मोठे सगळेच सामील ! होळी म्हणजे थोडं फार अग्निपूजन , तर रंगपंचमीला पाणी हवंच. धुळवडीला राख-माती-चिखलात खेळायचं, तर रंगपंचमीला अक्षरशः रंगंची उधळण ... मग ते कोरडे असोत , नाहीतर पाण्यातले ! उत्तर भारतात होळीपासूनच रंग खेळायला सुरुवात. मुख्य म्हणजे गुलाल. पण त्याआधी ....होळी म्हणजे काय ... शेकोटी ? ह्या शेकोटीत होळीचं मूळ असेल का ? कारण तेव्हा जीवघेणी थंडी असतेच. का खरंच प्रह्लाद आणि होलिकेच्या गोष्टीनंतर होळीची प्रथा आली असेल ? वाईट दुष्ट प्रवृत्ती जाळून टाकून, चांगल्या सभ्य प्रवृत्ती तावून सुलाखून बाहेर पडोत, ही...