स्त्री


आज ८ मार्च !   
 जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 
एक विचार मनात आला ...
एक मैत्री अशी ही व्हावी ...
.
.
.
रुसायचं आहे का ? रुसून बस , 
हसावसं वाटतंय ? हसून बघ !
खायचं नाहीये ? नको खाऊस , 
पण , डोळ्यात कशाला एवढा पाऊस ? 

सारखं रुसणं , सारखं रागावणं , 
कुणा ना कुणावर राग काढणं,                           
आतल्या आत कुढत राहणं ,                            
जगणं होईल ना कंटाळवाणं !

माहीत आहे मला , तुझं मन मी मोडलं , 
एकदा दोनदा नाही , असं बरेचदा घडलं ,
पण , सांग ना , नेहमी माझीच चूक होती ? 
बाकी सगळे बरोबर , तुझी हीच समजूत होती ? ... 

हे सगळं मी ,  कुणाशी बरं बोलतेय ? 
कुणाची आणि का , एवढी समजूत घालतेय ? 
हा भूतकाळाशी वाद , का वर्तमानाशी संवाद ? 
भविष्याशी तडजोड , का जगाशी कसला विवाद ? 

का हा समेट ,माझा माझ्या मनाशी ?
व्हावी का आता मैत्री , आपली आपल्याच स्वतःशी ? 
उशीर केला का , आपण आपल्याला ओळखायला ? 
वेळ गेली का आता , स्वतःशी मैत्री करायला ? 

पण  जगायचं राहून गेलं , अशी खंत नकोय मला , 
मला खरंच खूप आवडेल , माझीच मैत्रीण व्हायला !!!


- सौ अलका कुंटे, बंगलोर 
  +९१ ८७६२३ १६३८५

Comments

  1. Replies
    1. Thanks a lot , संजू !😊

      Delete
  2. YOU ARE MATURING DAY BY DAY IN WRITING AND SPREADING ALL THE JOYS. YASHOSHAR

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland