Alice in Wonderland - 4

 

    Last and best ... शॉपिंग ... !!!    एक दिवस धाकट्या सुनेबरोबर  - देविका बरोबर - फक्त शॉपिंग !   तिला तिच्या सासूचा make-over करायचाय ... तिने हट्टाने एक  T'shirt  आणि pant घेऊन दिली.   तिथून सुरुवात !   मग काहीही दिसलं की नातवंडांसाठी घ्यावं असं वाटायचं,  पण बॅगेत जागा नसणार हे कटू सत्य सतत समोर ... तरी थोडंफार घेतलंच.   भारी भारी सुंदर दुकानं, जिकडे तिकडे मोठे आरसे ... चमचमाट !   Stylish मुली - बायका ....त्यात मला मी फार  उपरी - out of place  वाटायचे !    नाही म्हणायला आल्या दिवशीच घेतलेले नवीन बूट मला जादूच्या बुटांसारखे वाटत होते !   कुठेही, कितीही फिरवून आणणारे, पाय नं दुखता !   थोडा खाऊ, चॉकलेट वगैरे दिवसभर खरेदी केली, पण तिथल्या बाकीच्या दुकानात आपण फारच फुटकळ वाटायचो मला !  मी प्रत्येक किंमत - डॉलर- रुपयांत किती ते बघायची , आणि मग नकोच वाटायचं ...पण घ्यावंसं ही वाटायचं ....द्विधा मनस्थिती ....! मग.... शॉपिंगचा खरा break-through संध्याकाळी आला !..... 

   ... दिवसभर भटकून विवेक कंटाळला.   देविकाला ऑफिसात urgent  काम आलं ... मनीष मला म्हणाला, "चल, येतेस का ? ....   तुझ्या type चं  शॉपिंग करूया ... !"  ..." म्हणजे कसं ...., पण ,  माझं ठरलंच होतं ... कशालाही नाही - नको म्हणायचं नाही ... निघालो .. गप्पा करत, लहानपणी शाळेतून पायी पायी घरी यायचो, तसे आम्ही दोघं  चालत चालत Bugis ला पोहोचलो ... आणि surprise ... ही  तर सिंगापूरची तुळशीबाग !   ठासून भरलेली दुकानं ... जरा हात लागला तर दहा गोष्टी गडगडतील !   खेळणी, कपडे, खाऊ, शोभेच्या वस्तू, पिशव्या, बॅगा, गळ्यातली, कानातली ... तुळशीबागच ! फुटपाथ वर आंबे , दुरीयन , फणस , नारळ !  आणि विकणारे, विकत घेणारे, सगळे तसेच !   घासाघीसही थोडीशी ... !   पिना-क्लिपा, hairbands ... थोडं फार घेतलं  आणि तिथेच पिशव्या विकत घेऊन, त्यात सगळं भरून आणलं ... मग घरी येऊन आपली खरेदी पहातांना,  एक-दोन ठिकाणी आपल्याला गंडवलं हे ही समजलं ... आपला proper टूरिस्ट झाला !   जरा खट्टू वाटलं, पण ज्यांच्याकरता आणलंय, त्यांना मी पूर्ण माहिती आहे ... माझं शॉपिंग मधलं (अ)ज्ञान आणि (न) हौस ही माहिती आहे, त्यामुळे ते विशेष mind करणार नाहीत, आणि ६ महिने चालण्याऐवजी ती वस्तू १-२ महिन्यातच घराबाहेर चालायला लागेल !   तेवढाच कचरा कमी नं !!

    एका संध्याकाळी एक Musical Drama पहायला गेलो.   Wicked  !   खूप सुंदर सेट्स आणि कसलेले कलाकार !   थिएटर ही सुंदर.   कुठेही घोळ न होता नाटक छान झालं !   अगदी वेगळा अनुभव !   अंधार करून जादूसारखं एका सेकंदात  सेट बदलणं !  ...      

      तिथे एक वेगळी, छानशी cute गंमत पहायला मिळाली.   तिथे चीन मधून exchange program खाली एका  शाळेची मुलंमुली आलेली होती, ८-१० वर्षाची, युनिफॉर्म मधे.  सोबत त्यांच्या २-३ टीचर्स होत्याच.   सगळी शिस्तीत बसली होती मुलं.   त्यांची किलबिल ही चालली होती.   माझ्या पुढच्या ओळीत २-३ मुली बसल्या होत्या.  त्यांची वेगळीच गंमत-जंमत !   नाटक सुरु व्हायला १०-१५ मिनिटं होती.  अन त्या मुली आपापसात खेळायला लागल्या ... बसल्या-बसल्या दोन जणी एकमेकींना टाळ्या देत - काहीतरी गाणं हळू आवाजात म्हणत ... झिम्मा ! मला माझं ' सरसर गोविंदा येतो ..... ' हे गाणं आठवलं ! माझी बहीण सांगलीच्या 'बापट बाल ' च्या अगदी दारात ' झिम पोरी झिम ' खेळायची ....आता नुकतंच , पाच सहा महिन्यांपूर्वी नातीने मला नवीन ' गेम ' शिकवला !त्या म्हणे शाळेत खेळतात ... अवोकॅडो , अवोकॅडो , करत झिम्माच खेळतात ! झिम्माच !देश , वेष , काळ , भाषा ... सगळ्या सीमा ओलांडून , पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा खेळ .... चीन मध्ये ही खेळतात !! मी चकीतच झाले !!! त्या मुली काहीतरी चिंग चँग म्हणत खेळत होत्या . कुणाचं चुकलं , की ती out , तिच्या जागी तिसरी येऊन , पुन्हा खेळ सुरू !!!....खूप मजा आली .....!!!

    ....पहाता पहाता शेवटचा दिवस आला.   बरंच पाहिलं, पण बरंच राहिलं ही !   ते पुढच्या वेळी असं ठरवलं ... हो, मी जाणार आहे परत तिथे ... नव्हे - "मी पुन्हा येईन " ... हा आता माझा 'मोटो' आहे ... आता !

    सगळं सामान कसं बसं बॅगांमधे कोंबून एअरपोर्ट ला आलो.   पाय निघत नव्हता, पण आलो.   बरोबर मनीष आला होताच.   सामान check-in  झाल्यावर म्हणाला, "चला एक मजा पाहू..."     "बरं बाबा, चल कॉफी पिऊया " ... करत आम्ही निघालो - मुळीच मूड नव्हता.   आमच्या घरून मुलं त्यांच्या घरी निघाली, तरी मला वाईट वाटतं ... इथे तर त्याला सोडून इतक्या लांब जायचं होतं.   पण त्याचं मन मोडायचं नाही म्हणून निघालो ... आणि तिथेच एअरपोर्ट वर बरंच चालून त्याने एका ठिकाणी नेलं.   म्हणाला 'आता पहा !'    हे तर अजून एक wonder  !    Jewel  waterfall ,   एअरपोर्ट च्या आंत !   सात मजले उंचीवरून खाली येणारा धबधबा !  


 बाजूला झाडं, पानं, बगीचा आणि, आणि काय Orchids  !!!   किती सुंदर !   एका मजल्यावर viewing gallery होती, तिथे तर अंगावर पाण्याचे तुषार - भिजवणारे !   सगळीकडे गार - गार, आजूबाजूलाही झाडांमधे रोषणाई ... अरे हे काय ... इथे नेहमीच सण, नेहमीच celebration रे,   wonder of wonders आहे हे गांव ... असं म्हणत त्याला टाटा करत ... ( हळूच डोळे पुसत ) निघाले, आणि परतीच्या विमानात बसले !!!  ...

  ... आणि एखाद्या सुंदर स्वप्नातून जागं व्हावं , तशी बंगलोरला येऊन पोहोचले ... शेवटी Wonderland सोडून Alice ला normal जगात यावंच लागतं नं ... !


 - सौ अलका कुंटे, बंगळुरू 

      +९१ ८७६२३ १६३८५ 

Comments

  1. खरच ! Wonderland च आणि वर्णन खूप सुंदर ! 👌👌🌷

    ReplyDelete
  2. Thank you !

    ReplyDelete
  3. खूप सुंदर वर्णन

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you , दिलीप !

      Delete
  4. Replies
    1. Thank you , ताई !! 😊

      Delete
  5. अलकाचे चणे कुरमुरे

    Alice in Wonderland - 4


    अलका आणि विवेक तुम्ही दोघे मनिषकडे सिंगापूरला पोचलात सगळेजण मिळून मस्त मजा केलीत . अलका तू तर टिपकागदासारख जे काही दिसेल आणि ऐकू येईल ते टिपून घेतलस .आणि त्याच  *reflection* चणे कुरमुरे च्या चार भागात दिसलं.

    सिंगापूर म्हटल्यावर मला १९६० साली आलेला याच नावाचा चित्रपट आठवला त्याला आता पासष्ठ वर्ष उलटली. तेंव्हा देखील आजच्या सारखी सिंगापूरची ओढ असलेली गाणी या चित्रपटासाठी लिहिली होती.

    देखो जी देखो सुन लो ये बात
    जीवन में एक बार आना सिंगापूर
    दिल का खजाना दूँगी तुझे,
    जीवन में एक बार आना सिंगापूर

    दुसरं गाणं

    ये शहर बड़ा अलबेला ,हर तरफ़ हसीनों का मेला
    पर और भी है कुछ आगे, तू चला चल अकेला
    सिंगापूर ,सिंगापूर ,सिंगापूर

    विवेक आणि अलका, तुम्ही  दोघांनी सिंगापूर भरभरून एन्जॉय केलंत त्याला भर म्हणून मी पाठवलेली  गाणी ऐकून झाल्यावर नवीन गाणं करा,कारण तुमचा मनीष तिथे असल्यामुळे तुम्ही म्हणाल

    जीवन में बार बार आना सिंगापूर

    प्रसाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland