Posts

Showing posts from February, 2026

चित्रकला - २

    आपण जेव्हा एखादं चित्रांचं प्रदर्शन  बघायला जातो, तेव्हा एका वेगळ्या जगात पोचल्यासारखं वाटतं !    एक चित्र म्हटलं, तर त्या मागचा विचार तर सोडाच, पण ते काढतांना किती गोष्टींचा विचार करावा लागत असेल, असं वाटतं !   कोणतं माध्यम, कसा surface , त्याचं काय मटेरियल, कोणते रंग, कोणती शैली ... किती पैलू एका चित्राचे !     आता आपण चुनखडी, गेरू इथपासून कुठल्या कुठे पोचलो आहोत !   रंगीत माती - minerals चे प्रकार, water-colors, oil paints, acrylic paints , इतकंच नव्हे तर transparent - पारदर्शक paints ... अजून कसले कसले paints, त्यासाठी लागणारं नवनवीन साहित्य, ब्रशने पेंट करायचं एवढंच नाही तर आता चाकू सुद्धा आणि thumb and finger painting म्हणजे लहानपणी रंगात हात बुडवून करत होतो त्याचा official प्रकार !   आणि हे साहित्य बनवणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या !    surface म्हणाल, तर सारवलेल्या जमिनी पासून special effects दिलेल्या भिंती ते काचेचे panels ! चित्राच्या शैलीचेही किती प्रकार नवे-जुने आदिवासी style , कलमकारी, फुलकारी,...

चित्रकला

     कालच एक गाणं ऐकलं.   जुनंच .   "यह कौन चित्रकार है, यह किस कवीकी कल्पना ... "   सिनेमातलंच !   बाकी details जाऊ द्या ... पण एखादं सुंदर चित्र, आणि त्याचा निर्माता / निर्माती यांच्याबद्दल मला खूप कौतुक वाटतं ..त्यांचं नाव माहीत असो का नसो ...  चित्र सुंदर आहे का नाही हा प्रत्येकाचा आपला आपला विचार ... पण ते काढणाऱ्याची किमया नक्कीच सुंदर !    जे वाटतंय ते कागद किंवा तत्सम कशावर तरी उमटवू शकतोय ... एक विचार, कल्पना मनात येते ... हळूहळू आकार घेते ... मग ती कागदावर उतरते ... असा हा चित्राचा जन्म - प्रवास !  आपली कल्पना मांडण्याची इच्छा, पद्धत ... !     इतिहासपूर्व काळ, किंवा पुरातनकाळ किंवा undocumented काळापासून आपल्याजवळ ही कला आहे. कोकणात रत्नागिरी , सिंधुदुर्ग परिसरात आजकाल खूप कातळशिल्प सापडत आहेत.   पठारावर कोरलेली चित्रं ... प्रचंड मोठी चित्रं .    शेजारपाजारच्या खेड्यातले लोकं त्यांना राक्षस चित्रं म्हणतात. त्या काळी कागद नव्हता , म्हणून दगडावर कोरली . त्यांना कातळ - चित्रं ...