Posts

Showing posts from March, 2026

नेमेचि येतो मग पावसाळा ...

      नेमेचि येतो मग पावसाळा ... तो येतो जूनमधे .   पण असाच  'नेमेचि'  येणारा एक दिवस म्हणजे - ८ मार्च ... International Women's  Day !   त्या दिवशी जग अगदी वेगळं असतं, वेगळं दिसतं, वेगळं ऐकू येतं  ... खूप जण खूप काही बोलतात त्याबद्दल, news  मधे,  TV वर, मोबाईलवर, पेपरात ... जिकडे तिकडे बायकांचा उदो उदो,    anybody who thinks he is somebody  , बायकांच्या समाजातल्या role   बद्दल, स्थानाबद्दल, योगदानाबद्दल बरंच काही बोलतो ... क्वचित कुठल्या झोपडपट्टीत, चाळीत जाऊन एखादं फूल, नाहीतर मिठाईचा डबा देऊन येतो..... ४-५ बायकांना शाल, श्रीफळ वगैरे देऊन सत्कार करतो ... दोन -चार वाक्यं सावित्रीबाई , जिजाऊंबद्दल बोलतो ... आणि मग उरकला दिवस !...     मुळात हा दिवस आला कसा ?    तर १९१७ साली रशियामधे लोकांचे हाल होत होते, अन्न -पाणी मिळत नव्हतं, तेव्हा रशियन बायकांनी मिळून बंड पुकारलं ... ' Bread and Peace '  ही त्यांची मागणी होती !  त्या आधी समान पगार, कामाच्या वेळा, आणि मतदानाच्या  हक...