My मराठी - ५
काही वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा माझे आईवडील एका लहानशा गावात रहात होते. मी माहेरी गेले होते आणि सुट्टीतला नेहमीचा उद्योग, - मुलांना मराठी शिकवणं ! त्याच्या अनेक सुरस आणि चमत्कारीक गोष्टी ! एक दिवस शेजारी जरा भांडणाचा आवाज आला. शेजारच्या काका - काकूंचा तसा रोजचाच कार्यक्रम. आई जाऊन भांडण सोडवून आली. "काय झालं गं ?" मी विचारलं. "काही नाही, नेहमीचंच ... कोणीतरी आऊचा चिऊ काऊ येतो आणि पैसे मागतो, हे देतात. मग ती बिचारी नाही का रागावणार ?" " आऊचा चिऊ काऊ ?" मुलाने कान टवकारले " ... म्हणजे कोण ? ह्या आऊंना एक मुलगा अन एक मुलगी आहेत का ?" "तू गप रे, तुला काय पंचाईती ?" "नाही, ते r elation काय ते सांग ? तुझं खूप असतं, आतोबा , मावसोबा, मेव्हणी - बिव्हणी ! मग आम्हाला काही कळत नाही." इति मुलगा. आ...