Posts

Showing posts from January, 2023

अधेली

      अधेलीची गोष्ट खूप जुनी आहे.   एक राजा होता.  त्याच्या राज्यात एक माणूस होता.  रोज संध्याकाळी तो माणूस राजवाड्याच्या कोटाबाहेर यायचा, तिथे दोन मिनिटे थांबून, काहीतरी बघून निघून जायचा.  त्याचा हा कार्यक्रम राजा रोज खिडकीतून बघायचा.   एक दिवस न राहवून त्याने त्या माणसाला बोलावून तो रोज काय करतो ,ते विचारलं.   माणूस म्हणाला, "राजेसाहेब, त्या भिंतीच्या  एका फटीत मी माझी अधेली जपून ठेवली आहे, ती रोज बघतो."    राजा म्हणाला, "अरे मी तुला १० मोहोरा देतो, त्या बदल्यात ती मला दे.   एवढी अधेली ती काय ..."      पण तो माणूस तयार होईना.   राजाने त्या अधेलीच्या बदल्यात बरंच काही देऊ केलं, पण माणूस अडूनच.   शेवटी राजा म्हणाला, "बरं, तुला अर्ध राज्य देतो ... तू म्हणशील तो हिस्सा ... "      तेव्हा तो माणूस खुलला अन म्हणाला, "हा इकडचा अर्धा हिस्सा, ... कारण ... त्या भागात माझी अधेली असेल !"   राजा हतबुध्द ... !         पुढे काय झालं ...

संक्रांत

    'हॅपी न्यू ईअर' ची झिंग उतरते,  आणि संक्रांत समोर येऊन उभी रहाते !   खरं म्हणजे ती उभी रहात नाही.   ती कुठेतरी चाललेली असते, ह्या दिशेने येऊन , त्या दिशेकडे !    तिचं वाहन, हातातली आयुधं, कोणत्या रंगाची साडी वगैरे तपशील पंचांगात असतो.  ती कुठूनही कुठेही जावो, ती माझ्याच दिशेने पहात  असते.   अनेक प्रश्न घेऊन, अगदी 'urgent',  'important', 'now or never'  अशी लेबलं घेऊन !   इतर कोणत्याही सणाची वाटत नाही , इतकी मला संक्रांतीची भीती वाटते ! ...      पहिला अर्जंट प्रश्न, मुलंच विचारतात !   "ह्या वर्षी तू काय आणणार आहेस looting ला ?"   "looting ?"  ह्या मुलांचं इंग्लिश - कम - मराठी फार ताप दायक असतं .   "हं हं , लुटायला !   तुम्हाला काय त्याचं ?"     मला लुडबुड खपत नाही अजिबात !    "काहीतरी खायची गोष्टच लूट ..."      "का ?"     "म्हणजे संपवता येते ...आठवतं का, तू मागे एकदा डबे लुटले होतेस ..."  ...

मशीन्स

       माझं आणि मशीन्सचं विशेष सख्य नाही, म्हणजे पटत नाही, अगदी खरं म्हणजे अजिबात आवडत नाहीत.  मशीन म्हणजे कोणतंही यंत्र, ह्या अर्थी ! माणसाने चाकाचा शोध लावला, ते एक साधन होतं !  कष्ट कमी करायला, वेळ वाचवायला, वगैरे !  मग या आणि अशा साधनांचा मेळ घालून यंत्रं बनली.  पण मुळात जर ही यंत्रं ,एक set of कष्ट दूर करून,  कष्टांचा दुसरा सेट देणार असतील,  तर काय उपयोग ?  आणि त्यामुळे वेळ वाचत नाहीच !     मिक्सरचंच उदाहरण घ्या.   सगळे म्हणतात , त्यात ताक-लोणी छान निघतं, अगदी घंटों का काम मिनटोंमे, पण ते लोणी  काढल्यावर त्या भांड्यात आणि झाकणात जो लडबडाट होतो,  तो स्वच्छ करायला काय कमी वेळ लागतो ?   जो वेळ वाचवायचा , तो त्या धुण्यात घालवायचा, आणि रवीने दही घुसळतांना जे विचार मंथन होतं , किंवा१०-१५ मिनिटं निवांतपणा मिळतो , तो ह्यात नाही !!  तेच food-processor चं.  त्यात कणीक  छान भिजवली जाते म्हणतात, पण हाताने कणिक भिजवतांना मनातली खुन्नस कणकेवर काढता येते. ती चांगली तिंबून घेता येते ! आणि ...