गूगल aunty
एकदा " L aughter the best medicine" मध्ये खूप छान गोष्ट वाचली होती. एक बाई मैत्रिणीला आपल्या सुट्टीतल्या trip बद्दल सांगत होती . घरच्या गाडीने कसे सगळे गेले, मग बर्फाच्छादित शिखरं, घाटवळणाचे रस्ते, उंच उंच हिरवीगार झाडं, मधूनच दिसणाऱ्या दऱ्या, सरोवरं ... ऐकता ऐकता मैत्रीण म्हणाली, "अगं, पण तू तर म्हणत होतीस की तुम्ही समुद्र किनारा दाखवणार आहात मुलांना ... सुंदर beach , वाळूत किल्ले -घरं ... तिथे आराम खुर्चीत पहुडून तू पुस्तक वाचणार आहेस, मग एकदम डोंगर - दऱ्या ... ?" असं म्हटल्यावर त्या बाईला रडूच फुटलं. "काय सांगू बाई, माझ्या नवऱ्याला पत्ते - रस्ते विचारायला बिलकुल आवडत नाही ... मग काय करु गं मी ?" गोष्ट अमेरिकेतली असो नाहीतर कुठलीही ... तात्पर्य काय, तर नवरे लोकांना कोणाला विचारायला आवडत नाही, पत्ता असो का रस्ता ! मग मी आणि माझा नवरा त्याला अपवाद कसे असू ? त्याला पत्ता विचारायला आवडत न...