Posts

Showing posts from September, 2023

C C D

      कोणाला कशाची allergy असते तर कोणाला कशाची !    मलाही आहे ... बऱ्याच गोष्टींची ... काही पदार्थांची, काही सुगंधांची आणि अगदी काही शब्दांची सुद्धा !...     जसं कोणी 'गोची' म्हटलं की मला सगळीकडे खाजायला लागतं .    मला अजून एक शब्द आवडत नाही तो म्हणजे 'योगा' ... !    मी योगा करायला जाते असं म्हटलं कुणी,  की वाटतं "अगं बये, योगासनं करायला जाते असं म्हण ना ... आपण फॉरीनवाल्यांसारखं 'योगा' का म्हणायचं ?   माझं शब्दावरच थांबत नाही.   मला योगासनं करायला ही आवडत नाही.      तर या 'योगा'चं   आणि माझं अजिबात पटत नाही ... आमचे योगच जुळत नाहीत.   मी शाळा-कॉलेजात असतांना हे योगाच खूळ इतकं माजलं नव्हतं किंवा ते आमच्यापर्यंत पोहोचलं नव्हतं.   दर शनिवारी सकाळी  P. T. च्या तासाला जी काही कवायत किंवा  mass P. T. म्हणजे  जे काही हातापायांचे प्रकार करवून घ्यायचे, तिथपर्यंतच माझी मजल !   नृत्य वगैरे प्रकार आपल्याला झेपणारेच नव्हते.   त्यामुळे 'य...

रुमाल

        ' दूंगी तेनु रेशमी रुमाल,  ओ बांके जरा डेरे आना ... '     प्रेमपुजारी सिनेमात एक लाल रुमाल घेऊन वहीदा रेहेमान छान dance करते नां !   तिचा तो हातखंडाच , तिच्या हातातला लाल रुमाल ही खूप मस्त दिसतो ...      रुमाल ही अशी चीज आहे ,  की ती छानच असावी !   केवळ एक कापडाचा चौकोनी तुकडा ... असं त्याचं रूप होऊ शकत नाही,  की केवळ utility item - वापरायची वस्तू असंही होऊ शकत नाही !   रुमालावर कधी नाजूक फुलाफुलांचं print, आणि त्याला matching दोऱ्याने कडा शिवलेल्या, त्याही सुबकपणे, कधी अगदी नाजूक अशी लेस, कधी हाताने केलेली किंवा मशीनची !   असं वाटतं की 'व्यक्ती तितक्या प्रकृती 'हे रुमालाबद्दलच लिहिलेलं असावं ! प्रत्येक    रुमालाला स्वतःचं असं व्यक्तिमत्व असतंच असतं.  आणि  खरं म्हणजे ,त्यावरून तो रुमाल ज्याचा किंवा जिचा असेल तिच्याबद्दलही  बरंच कळतं !             माझ्या लहानपणी माझ्या वडिलांचा रुमाल खूप मस्त दिसायचा.   पांढरा शु...

"हानीकारक ... "

      नुकतीच एका समारंभाला जाऊन आले. एक तरुण जोडपं त्यांच्या नवीन बिझनेसचा शुभारंभ करत होते . जरा उत्पटांग कल्पना होती , risks ही भरपूर होत्या . पण , अशाच तर नवीन , innovative कल्पना जगाला पुढे नेतात !! खाणं-पिणं, एकमेकांना शुभेच्छा देणं वगैरे सर्व उरकल्यावर घरी जायला निघालो, आणि समारंभाचे कर्ते-करविते आले आणि त्यांनी वाकून नमस्कार केला.   "अरे,  अरे,  हे काय ... " वगैरे झालं,  पण मनातून छान वाटत होतं ... एकतर नमस्कार केला म्हणून खूष ... आणि दुसरं म्हणजे मुलांना चांगलं वळण आहे हे पाहून आणखी खूष ! कशाचं छान वाटावं , हे बहुतेक वयावर अवलंबून असतं !   त्यांना आशीर्वादपर काहीतरी छान छान म्हणून तिथून निघालो ...पण , तो आशीर्वाद काही पटत नव्हता . लौकिकार्थाने तो अगदी बरोबर होता , पण , माझं मलाच काहीतरी खटकत होतं ... त्यात काहीतरी दुरुस्ती हवी होती ... "तुमच्या मनासारखं होऊ दे , का तुमच्या भल्याचं होऊ दे ?" ... काय म्हणावं ?     घरी जाताना , त्या सर्व कार्यक्रमाचा विचार करता करता,   माझी गाडी आशीर्वादावर येऊन थबकली ... एक...