Posts

Showing posts from October, 2024

Problem of plenty

       नुकतेच मुलाकडे  ४-६ दिवस रहायला गेलो होतो.   मुलगा-सून दोघेही आपापल्या कामात नेहमीपेक्षा जास्त busy असणार होते, म्हणून नातवंडांच्या आणि त्यांच्या वेळा सांभाळणं हे मुख्य काम होतं.   एका दिवसातच माझ्या लक्षांत आलं की, मला खरंच हातपाय हलवल्याशिवाय गत्यंतर नाही ... कारण मला काहीच सापडत नव्हतं.   नातवंडांच्या खोलीत त्यांची दोन कपाटं भरून खेळणी, दोन कपाटं कपडे, दोन कपाटात कागद-वह्या-पुस्तकं, आणि चिटोरे.  शिवाय दोन टेबलं भरून पेन्सिली, रबर, crayons, paints, स्केच पेन्स, कात्र्या, कागद,  आणि हर तऱ्हेचं art material ... !त्यातच कपडे .    "अरे, हे काय सगळं ... ?"     "आजी, हे सगळं कामाचं आहे, ताईच्या बाहुल्या सगळी space घेऊन टाकतात.  माझा एक sock सापडत नव्हता, मग दिसला म्हणून ह्या mess मधून ओढला ना आजी, तर what ?   आजी , तो लोलाचा red frock होता !"   नातू म्हणाला !     "आणि तुझे blocks आणि मोडक्या गाड्या ? ... आजी, ह्या चार चाकाच्या  प्लॅस्टिक च...

दुर्गापूजा

Image
    हे शारदीय नवरात्र सुरु झालं,  म्हणता म्हणता,  संपलं देखील ...  रोज सकाळी उठल्यावर, आज कोणतं रूप देवीचं,  त्याचा अर्थ काय, पूजा - नैवेद्य ... सगळ्याचीच घाई.   दररोज एक नवीन फुलांची माळ, धान्य कसं उगवतंय, किती उगवतंय ... समईत पुरेसं तेल आहे नं ... नऊ दिवस अखंड समई हवी नं ... !   हे सगळं बघण्यात आणि सर्व रूपांचे लाड, कौतुक पुरवण्यात घरच्या बाईला नवरात्र सुरु झाल्यापासून संपेपर्यंत एक क्षण उसंत नसते ... नऊ दिवस अखंड एक दिवसासारखा घालवतात ... without break , अगदी रात्री दोन वाजता जरी जाग आली , तर आधी ताडकन उठून समई-दिवा चालू आहे नं  ते बघून येतील, ... स्वैपाकघरात जाऊन थोडीशी उद्याची तयारी पहातील, काहीतरी विसरलेलं करून येतील ... मगच पुन्हा झोपतील ... शिवाय सगळ्यांच्या आधी उठून, काही नाही तर उपासाचं वगैरे काहीतरी करून ठेवतील ...      असं हे नवरात्र !  घट बसवण्यापासून सुरु होतं . पूजेचं सर्व सकाळ-दुपार मधे होऊन जातं.   आणि मग एकमेकींना हळदकुंकू देणं, कन्या पूजन, भजन वगैरे सगळा संध्याकाळचा कार्यक्रम.  ...

यक्षप्रश्न

      वेद व्यासांनी महाभारत लिहिलं आणि जग म्हणालं, जगात आहे ते सर्व ह्यात आहे, आणि ह्यात नाही ते कुठेच नाही !  आपण ते पदोपदी पहातो, अनुभवतो.   महाभारताला ३,००० ते ५,००० किंवा जास्तच वर्ष झाली असतील.   तरी आपल्या बोलण्यात त्याचे उल्लेख आहेत, जसे काही त्या वेळी आपण तिथे होतो, आणि नुकतंच तर झालं ते सर्व ... !     यक्षप्रश्न हा शब्द !    मी तर सतत वापरते ... खरं म्हणजे माझ्यापुढे प्रश्न - मग तो कोणताही असो - की मला तो यक्षप्रश्नच वाटतो.   युधिष्ठिराला यक्षाने प्रश्न विचारले, आणि वर खरी-बरोबर उत्तरं दे असाही दम भरला.   आजूबाजूला आपले चारी भाऊ निपचित पडलेले , कोणीही  काहीही सांगितलं असतं.   पण तो पडला युधिष्ठीर ... सारासार विचार आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्याने बरोबर उत्तरं दिली ... किंवा असं म्हणा की यक्षाला हवी ती उत्तरं दिली, आणि ह्या कठीण प्रसंगातून सहीसलामत सुखरूप बाहेर पडला.    पण असं वाटतं की ते प्रश्न कठीण नव्हते ... त्यांची उत्तरं ही तीच .. नेहमीची घिसीपिटी ... ज्ञानामृत typ...