एका हाताची टाळी
परवा मैत्रिणीशी फोनवर बोलत होते . दुसऱ्या एका मैत्रिणीची सहज चौकशी केली . तर , बोलता बोलता मैत्रीण म्हणाली, "अगं, मीच किती सारखी चौकशी करायची, खुशाली विचारायची तिची ? मैत्री काय एकतर्फी टिकते का ? एका हातानी टाळी कशी वाजणार ?" आणि , मी विचार करू लागले ... ... एका हाताची टाळी ... किती वेगळी कल्पना आहे ... टाळी वाजवायला दोन हात लागतात. स्वतःचाच दुसरा हात नाहीतर दुसऱ्या कुणाचा. पण दोन हात हवेतच ... माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे ... social animal ... त्याला सुखात ,आनंदात जगायला त्याच्या अवती भोवती कोणीतरी हवं असतं. मौखिक भाषा येते , म्हंटल्यावर तर नक्कीच हवं. आणि मग आनंद-सुख-समाधान , कुणाचं कौतुक , दाखवायला expression हवं - म्हणजे टाळी आलीच ! आणि मग दुसरा हात ही हवाच ! अगदी लहान बाळाला 'टाळ्या पोळ्या गुळाच्या' आपण शिकवतो. ते बाळ पण टाळ्या वाजवत हसतं, जसं काही त्याला आपण expression...