या या भुलाबाई...
बघता बघता नवरात्र संपत आलं, दसरा आला दोन दिवसांवर ... आणि कोजागिरी पौर्णिमेचे वारे वाहू लागले ... पण त्याच्या आधीच ललिता पंचमी पासून अजून एक मस्त उत्सव सुरूही झालाय ... मुलींचा हादगा ... कोणी भोंडला म्हणतात ... आमच्या तिकडे, म्हणजे विदर्भात ... भुलाबाई ! तोच सण ... खास करून मुलींचा ... गाणीही थोड्याफार फरकानी तीच, आणि मुलींचा उत्साह ही तोच ... अफाट ... घट बसल्यापासूनच मुलींचे plans सुरू ... खुसुखुसु करत ... "ए, माझ्याकडे एक दिवस हं"... "थांब, आधी पहिला दिवस माझ्याकडे" ... " हो, आम्हाला नकोच आहे ...पहिल्या दिवशी खिरापत काय ...सोपी असते ओळखायला" ... "ए, नको मग माझ्याकडे ... कुण्णा कुण्णाला ओळखता येणार नाही अशी मी आईला सांगणार आहे करायला ... !"... तर ललिता पंचमी पासून संध्याकाळी मैत्रिणींकडे, शेजारी पाजारी जाणे ... भुलोजी - भुलाबाईच्या मातीच्या मूर्ती आणून त्या फुलांनी सजवणे, रांगोळ्या काढणे आणि मग गाणी ... गाणी म्हणणे, खिरापत ओळखणे ... रोज एक गाणं जास्त म्हणायचं ! तेव्हा हस्त नक्षत्र असतं , म्हणून ,...