Posts

Showing posts from January, 2026

ठोकताळे

    काही दिवसांपूर्वी मैत्रिणीशी फोनवर बोलतांना  ठोकताळे हा शब्द बोलण्यात आला .  तसा नेहमीचाच शब्द, पण अर्थ कसा ठासून भरलेला.   त्यात किती गोष्टी compact करून भरलेल्या आहेत.   अनेक वर्षांचा, कधी अनेक पिढ्यांचा, हजारो वर्षांचा अनुभव, त्यावरून काढलेले निष्कर्ष, ते ताडून पहाणं... हे सगळं करूनही थोडंसं suspense element...अंदाज  खरा ठरेलंच असं नाही,  असा  disclaimer   - म्हणजे ठोकताळा ! ...     शाळा-कॉलेजमधे असतांना, तसे आमचे बरेच  संकेत असायचे.   ईश्वरी संकेत  नव्हे,  निसर्ग संकेत !  उदा. अमरावतीला पाण्याची चणचण, रुक्ष जमीन.  तिथे आमच्या आवारात एक शेवग्याचं झाड होतं , त्याला डिसेम्बर मधे फुलं यायची.   शेवग्याला फुलं यायला लागली, की आपला अभ्यासाचा मौसम आला, असा परीक्षेचा संकेत !    तेव्हा शाळा-कॉलेजात सतत अभ्यास नसायचा !   डिसेम्बर संपता संपता सुरु केलेला अभ्यास, परीक्षेत पास व्हायला पुरेसा असायचा !   आजकाल इथे बंगलोरमधे पहाते तर १२ महिने शेवग्याला...

Black is beautiful

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !    मागच्या वर्षातले ups and downs , सुखदुःखं,  सगळं संभाळत नवीन वर्षाचं स्वागत !!!    कारण, काळ थांबत नाही, तुमचं काय झालं याची त्याला पर्वाही नाही.  असो !     तर, नवीन वर्ष, नवीन पान उलटलं नव्या कॅलेण्डरचं.    मागचे सहा महिने काही ना काही कारणाने काहीच लिहिणं झालं नाही.   काही सुचतही नव्हतं ... writer's block वगैरे यायला, आधी चांगला writer व्हायला पाहीजे ... पी हळद की हो गोरी ... असं ते नाही ... त्याकरता अजून बरंच लिहायला हवं ...    हो गोरी ... गोऱ्या रंगावरून सुचलं,  आज   black is beautiful  हाच विषय घेऊन पांढऱ्यावर काळं करायचं ... तशी पण  आता संक्रांत अगदी तोंडावर आली आहे ... तिला काळा सण  असं ही म्हणतात ...      तर विचार करत होते ... काळा आणि सण ... हा विरोधाभास आहे ... त्याचा अर्थ काय ?   ह्यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे ... काळ्या रंगाचा किंवा कोणत्याही रंगाचा विचार केला तर त्याला काहीतरी अर्थ नक्कीच असतो, आह...