Posts

Art without boundaries

       पंछी, नदिया, पवन के झोकें        कोई सरहद ना इन्हे रोके  ...      हे famous गाणं, ह्यात art - कला हा शब्द ही घालायला हवा होता. कारण ... कला -  मग ती कोणतीही असो, तो मानवी मनाच्या स्फूर्तीचा - आनंदाचा - creative energy चा आविष्कार आहे असं मला वाटतं ... त्याला कशाला हव्यात मर्यादा, सरहदी किंवा कसल्या limits ? ...  Copyright चे नियम सांभाळून जर कोणाला दुसऱ्या कुणाची कला आपलीशी करावी किंवा ती शिकावी असं वाटलं, त्यातून आपले काही विचार मांडावेसे वाटले, तर त्यात काही वावगं नसावं ...      काही कलाविष्कार हे खरंच स्थळ, काळाच्या सीमा पार करून जातात ... जशी रवी वर्मा यांची चित्रं !    ती आजही तितकीच सुंदर आणि ताजी वाटतात !   त्यांच्या चित्रातल्या व्यक्ती खऱ्या-खऱ्या, जिवंत वाटतात !   कोणी तसंच चित्र काढायचं म्हटलं , तर दहा वेळा विचार करेल !    आपल्या हळदणकरांनी काढलेल्या Lady with the lamp ह्या चित्राच्या कितीतरी नकला झाल्या, पण त्या नकलाच राहील्या !  ...

Alice in Wonderland - 4

Image
      Last and best  ... शॉपिंग ... !!!    एक दिवस धाकट्या सुनेबरोबर  - देविका बरोबर - फक्त शॉपिंग !   तिला तिच्या सासूचा make-over करायचाय ... तिने हट्टाने एक  T'shirt  आणि pant घेऊन दिली.   तिथून सुरुवात !   मग काहीही दिसलं की नातवंडांसाठी घ्यावं असं वाटायचं,  पण बॅगेत जागा नसणार हे कटू सत्य सतत समोर ... तरी थोडंफार घेतलंच.   भारी भारी सुंदर दुकानं, जिकडे तिकडे मोठे आरसे ... चमचमाट !   Stylish मुली - बायका ....त्यात मला मी फार  उपरी - out of place   वाटायचे !    नाही म्हणायला आल्या दिवशीच घेतलेले नवीन बूट मला जादूच्या बुटांसारखे वाटत होते !   कुठेही, कितीही फिरवून आणणारे, पाय नं दुखता !   थोडा खाऊ, चॉकलेट वगैरे दिवसभर खरेदी केली, पण तिथल्या बाकीच्या दुकानात आपण फारच फुटकळ वाटायचो मला !  मी प्रत्येक किंमत - डॉलर- रुपयांत किती ते बघायची , आणि मग नकोच वाटायचं ...पण घ्यावंसं ही वाटायचं ....द्विधा मनस्थिती ....! मग.... शॉपिंगचा खरा break-throug...

Alice in Wonderland - 3

Image
           निसर्गाचं एवढं सुंदर लेणं पाहिलं ... आणि मानव निर्मित चमत्कार ही पाहिले.   तिथल्या एक एक buildings, त्यांचं structure, उंची आणि त्यांचं facade  !!    युरोपात, अमेरिकेत ही सगळं आहेच, पण इथल्या buildings जिवंत, throbbing अशा वाटतात, कारण आजूबाजूला, चौफेर झाडं आहेत.   काही buildings मधे १०-१२ मजले गेले की पुढचे एक दोन मजले किंवा त्या मजल्यांचा बाहेरचा भाग तरी फक्त झाडं !   चांगली मोठीही, आणि फुलझाडं - orchids आणि ferns  वगैरे तर विचारूच नका.   सुंदर landscaping करून, एक breathing place, सुंदर बाग करतात, त्यामुळे सिमेंटच्या जंगलापेक्षा, बागेतल्या बिल्डिंग असं वाटतं !   Durian Domes,  Cloud Forest, Chinese देऊळ, architectural marvels.   आमच्या मुलाच्या घरातून सिंगापूरचं National Stadium दिसायचं.   त्याचं छत.   सकाळ झाली की आत सूर्यप्रकाश जायला, त्याचे दोन भाग होऊन दोन्हीकडे slide व्हायचे.   आणि खूप ढग आले, पावसाची वॉर्निंग असेल की लगेच दो...

Alice in Wonderland - 2

Image
      ... orchid garden पाहिल्यावर डोळे, मन निवले होते ... पण पाय दमले होते.   एक दिवसाच्या विश्रांतीनंतर जवळचे २ - ४ मॉल पालथे घातले.   शॉपिंग थोडंसंच , पण त्याचा ही 'श्रीगणेशा' करायलाच हवा, नाहीतर शेवटी घाई घाई होते, किंवा त्याला कात्री लागते ... म्हणून थोडंसंच केलं ... आणि पुढचा दिवस ...      आज काय पहायचं, असं म्हणेस्तोवर प्लॅन झालेला होता.   आज River Wonders.   पाणी आणि पाण्याच्या आत आणि आसपास रहाणारं प्राणी जगत !   असून असून किती असणार ... म्हटलं बघू चला, लवकर आटपेल, घरी येऊन झोप काढू ...     ... निघालो आणि surprises सुरु !   टॅक्सीत मी समोर बसले, छान view यावा म्हणून, आणि बघते तर dashboard वर एक छानसा सुबक गणपती, समोर उंदीरमामा, मोदक, उदबत्ती ... हे सगळं एका सुंदर प्लास्टिक case मधे .   बाप्पाच्या डोक्यावर एक सोनेरी छत्र !   मी न राहवून त्या ड्रायव्हर ला विचारलंच ... this Ganesh idol ... ??   तर तो म्हणाला, " I pray to Ganesh !"    तो च...