Posts

Showing posts from March, 2022

त्याचं नाव ...

      " नांवात काय आहे ?"        ह्या तऱ्हेचं, ह्या विषयावर सगळ्यांचं खूप बोलून झालंय.      ह्या वाक्यासाठी शेक्सपिअरचं  नाव जितक्या वेळा घेतलं जातं, तेव्हढं  त्यांच्या नाटकांबद्दलही घेतलं जात नसेल !   पण नावात बरंच काही आहे,  असतं.     तसं नसतं, तर आतापर्यंत इतकी वेगवेगळी नांवं जगात आली नसती.  सगळेजण आपापल्या पत्रिकेतल्या अक्षराप्रमाणे  'डेमदेव' नाहीतर 'कोमादेवी' अशी नांवं धारण करून असते !     बंगाली लोकांमध्ये एक मजेदार पद्धत आहे. त्यांना दोन नावं असतात.  एक 'भालो-नाम'.   म्हणजे  खरं, चांगलं, official   नाव आणि दुसरं  'डाक-नाम',  म्हणजे हाक मारण्याचं, किंवा बोलण्यातलं नाव !      मी लहान असतांना कलकत्त्याला पहिल्यांदा  गेले तेंव्हा शेजारची मुलगी खेळायला आली.  तिचं खरं नाव प्रकीर्ती आणि डाक-नाम 'टुबलू ' !   दोन्हींचा काहीही संबंध नाही !      आपल्याकडे कसं, फारतर short-form   ...

तुझं माझं जमेना ...

      " आता येऊ दे तिला, मग बघ कशी खरडपट्टी काढते तिची ते !   उशीर म्हणजे किती उशीर करायचा ?   रोज नवीन बहाणे,  आज तिला स्पष्ट सांगून टाकणार आहे, यायचं तर वेळेवर ये, नाहीतर चालती हो ! ..."  आजीचा राग नुसता ओसंडत होता तिच्या बोलण्यातून.  तिची मोलकरीण जी आठ वाजता यायला हवी होती, ती अकरा वाजले तरी उगवली नव्हती !    साहजिकच आजी संतापली होती.           एवढं बोलणं होतंय, तोच ती आली.  पण ती फारच चलाख !  आल्या आल्या तिने सुरु केलं,  " काय सांगू बाई, आजकालच्या पोरी ..."     तिला आजीचा weak point चांगलाच माहीत आहे !   " अवं, ती शांती ... पलीकडल्या झोपडीतली, तिच्या पोरानं पैसा घातला तोंडात, अन् अडकलान् बाई घशात, लागलं पोर घुसमटायला ... लक्षच नाही वो ह्या बाईचं. आपली पोरं काय करतात, काय खातात ..."      " आणि मग ?"  आजी चांगलीच गुंगली गोष्टीत.     " मग काय ?   एक धपाटा घातला पाठीत  म्या "      " शांतीच्या ?...

भविष्य

        " चल लवकर, पान वाढलंय, वरण भात गार होतोय   ..." आजीची हाक आली.      " आलेच, एका सेकंदात एवढं भविष्य वाचते, आणि येते .."  असं म्हणून मी पेपर उघडला.   आतल्या कुठल्या तरी पानावर रोजचं भविष्य यायचं. अगदी एक - दोन शब्दांत . मेष - पैसा मिळेल, वृषभ - तब्येत संभाळा ... करत करत माझ्या राशीचं भविष्य - पतीपत्नीत मतभेद !   हरे राम ... दोन सेकंद वाया गेले. इथे दुरूनही कोणी 'होतकरू पती ' म्हणण्यासारखं दिसेना ! आता काय करावं ?       तर , भविष्य खरं -खोटं  पहाणं शक्यच नव्हतं. छापकाटा करायला नाणं उडवावं आणि ते कुठल्यातरी खाचेत उभं जाऊन अडकावं तसं झालं !  मग विचार करत बसले. ह्या भविष्याला काय अर्थ आहे ?  जगातल्या  १/१२th लोकांना हे लागू पडणार.  सरसकट.  म्हणजे  १/१२ हून जास्त माणसं आज एकमेकांशी भांडणार. आणि ह्या १/१२ th  लोकांच्या other halves  चं भविष्य काही वेगळंच असणार ! त्याचं काय ? पेपरात नुसतं  'धनलाभ' म्हटलं की झालं. पण धनलाभ म्हणजे काय ?   ...

३६५ वा दिवस

    "आजी, हे बघ मी तुझ्यासाठी card केलंय, happy women's day  ! "  नातीनी काल माझ्या हातात एक cute card ठेवलं !  त्यावर एक छानसं चित्र ! आत तिचं आणि माझं चित्र !       " तुला कोणी सांगितलं ?"      " काल गेलो होतो नं आम्ही मॉल ला, तिथे सगळीकडे लिहीलं होतं !..."      " आजी, women's day   असतो,  तसा men's  day कधी असतो ?"   तिनं विचारलं.  नुकतीच नवऱ्याशी जरा खाटपीट झाली असल्यामुळे मी पटकन म्हटलं, " बाळा, men 's  day तर वर्षातले ३६४ दिवस रोजच असतो ..."     ती बुचकळ्यात पडली.        खरंच, उद्या मी विशेष काय करणार आहे ? खरं म्हणजे कोणती बाई काय विशेष करणार आहे ? WA वर शंभर - दीडशे मेसेजेस येतील. गावोगावी ३ - ४ महीला मंडळं एक कार्यक्रम आयोजित  करतील. कोणत्यातरी प्रसिध्द, कर्तृत्त्ववान - इथे ही  वान हा पुल्लिंगवाचक शब्दच - तर कर्तृत्ववतीला बोलावून सत्कार, फु.  गु., एक बिनकामाची  पर्स, शाल, आणि मग वायफळचा मळा ! ...      एक...

कवच कुंडलं

         " अरे, स्वेटर नको का ?  निदान windcheater तरी ?  खूप गार आहे, ढगही आहेत ... "     दोन्ही मुलं शाळेत जायला निघाली होती ,  आणि माझी आई त्यांना म्हणत होती .      " काही सांगू नकोस  त्यांना.  काही नको असतं त्यांना.  कवच कुंडलं घेऊन आलेत बहुतेक !"    माझा वैताग लपला नाहीच.    वैताग मुलांच्या न ऐकण्याचा .  "  बाहेर जाणाऱ्याला असं रागावू नाही.  तुम्हीही असंच करायच्यांत !..."     आई म्हणाली.     " पण तेंव्हा एवढी थंडी नसायची, आणि किती गोष्टी न्यायला लागायच्या आम्हाला ... पर्स, रेकॉर्ड, वह्या, dissection box .... आणि त्यात स्वेटर ?  जे तासाभरात अंगावरुन उतरवून गळ्यात नाहीतर मांडीवर घेऊन बसायचं, नाहीतर बॅगेत कोंबायचं ?" ...   आणि मग मला जाणवलं की मी मुलांचीच बाजू घेतेय !   आणि आईचीही !     म्हणजे मी नेहेमीच चूक ?      का नेहेमीच बरोबर ? ...     आपण कोणत्या भूमिकेत आहोत त्य...