Posts

Showing posts from February, 2024

भाषा

      आजकाल , एक  फोटो सोशल मीडिया वर सारखा दिसतो . एक माणूस , सुमारे 50 असावा , अमेझॉन च्या खोऱ्यात रहाणारा . तो काय बोलतो , म्हणजे कोणती भाषा बोलतो ,ते कोणालाच कळत नाही . त्याच्या आदिवासी जमातीतील तो एकटाच राहीला आहे ...किती भयानक आहे .. जुबाँ  मिली है , मगर हमजुबाँ नहीं मिलता ....!!अशीच एक बातमी काही वर्षांपूर्वी पेपरात वाचली होती ...  इंडोनेशियाच्या एका बेटावर एक भाषा बोलली जाते.   पण ती भाषा बोलणारे फक्त तीनच लोक उरले होते .   त्यापैकी एक माणूस ७५ वर्षाचा, तेव्हा आणि दुसऱ्या दोघी बायका ४५ आणि ३५ अशा वयाच्या.    ही भाषा नामशेष होऊ नये म्हणून युरोपातील शात्रज्ञ तिथे जाऊन त्या लोकांकडून जमेल तेवढी भाषा रेकॉर्ड करून ठेवणार होते .   माझ्या मनात आपला उगीचच एक किडा आला.   समजा,  त्या दोघीच राहिल्या आणि त्यांचं भांडण झालं, आणि त्या एकमेकींशी बोलल्या नाहीत तर काय होईल ? ...      त्याच लेखात पुढे लिहिलं होतं की उत्तर भारतातल्या सगळ्या भाषा आणि युरोपातल्या भाषा ह्या तुर्कस्तानात उदयाला आल्या अस...

Treasure hunt

Image
   नुकतीच झालेली गंमत !   पुतणीने एक छानपैकी family get-together केलं.   तिथे बच्चे कंपनीला busy ठेवायला तिने एक गेम ठेवला होता.    Treasure hunt .. . एक clue दिला , आणि मुलं निघाली शोधायला !  त्या clue चा अर्थ लावायचा, ती जागा शोधायची ... तिथे पुढचा clue ... पुढची जागा शोधायची ... असं करत जायचं.  ज्याला आधी तो खजिना मिळेल , तो जिंकला !... तो खेळ खेळतांना मुलांचा दंगा, धावाधाव, clue चा नक्की अर्थ कळला की आनंदाने नाचणं, आणि मग जेव्हा actual खजिना सापडला, तेव्हा तर विचारूच नका ! मुलांचा खेळ पहातांना नवऱ्याला ' It's a mad mad mad world ' ची आठवण झाली, तर मला ' McKenna's gold '  ची !      खरं तर,  बघता बघता ही treasure hunt मला माझ्या लहानपणात पोहोचवून आली !  आजकाल , काही न काही निमित्ताने लहानपणात डोकावते मी येता जाता .. कारण , भविष्य काळ माहीत नाही , आणि वर्तमान काळाबद्दल बोलायचं म्हंटलं , तर running commentary द्यायला , आपण काही क्रिकेट सारखे रोज नवनवीन विक्रम करत नाही ! असो . तर , आपल्या वेळी हा खेळ होता...

No trick ... only treat !

        नुकतीच एका सुंदर कार्यक्रमाला जाऊन आले.   गाण्याचा - नाटकाचा नाही ... तर  एक समारंभ ... घरातलाच ... एका बाळाच्या बोरनहाणाचा !   त्याला विदर्भात वगैरे,  'लूट' ही म्हणतात ! काय मस्त idea !   खाऊची लूट, खरं म्हणजे लयलूट, आणि लुटालूट ही !      बाळाची लूट चालू होती !   ते बाळ जरासं भेदरलेलं ... इतकी माणसं आजूबाजूला ... आई दूर कुठेतरी ... आणि अचानक डोक्यावर काहीतरी पडतंय ... पाणी नाहीये ... काहीतरी रंगीत रंगीत !! पण , खरी मजा मात्र बाकीच्या छोट्या मुलांना येत होती ! बाळाच्या डोक्यावरून बोरं , चुरमुरे , श्रीखंडाच्या गोळ्या  , बिस्किटं , शोपेच्या गोळ्या ....दरवेळी नवीन खाऊ ! हे वेचू का ते वेचू . ..सगळ्यांच्या साड्यांचे घोळ ...त्यातून वाट काढत ,  खाऊ उचलायचा ...नुसती धांदल !!! काही ढालगज भवान्या तर परकराच्या ओच्यात खाऊ गोळा करत होत्या . मुलग्यांच्या चेहेऱ्यावर inadequacy चं feeling ...पॅन्टला दोनच खिसे !....त्या बाळाच्या डोक्यावर मूठभर खाऊ घालण्याच्या ऐवजी , मी ह्या मुलांचाच आनंद मनात गोळा करत ...

सहजीवन

      Peaceful Co-existance  .. . माझ्या नवऱ्याचं एक छोटंसं, साधं - सुधं स्वप्न ! ..... पण ते त्याला पहाटे पहाटे पडलं नसावं ... नाहीतर , खरं झालं असतं ... !     बिचारा !      कोणत्या जगात ... कोणत्या काळात रहातोय, रमतोय माहीत नाही ... !!!     मी असं म्हणायला , कारण ही तसंच आहे.   आमच्या लग्नानंतर, एक दिवस असंच walk ला गेलो असतांना, गप्पा मारत असतांना,  त्याने लग्न म्हणजे , हीच त्याची कल्पना असल्याचं सांगितलं ... आणि खरं म्हणजे , मला काहीच कळेना ... हा खरंच innocent, स्वप्नाळू  आहे, का त्याच्या स्वतःच्या expectations सांगतोय  ... !      Co-existance  म्हटलं की आठवतो तो शब्द म्हणजे 'सहजीवन' !     जिथे दोन व्यक्ती, प्राणी, even वस्तू,  एखादी जागा, वातावरण share करत आहेत , ते सहजीवन किंवा co - habitation !   तिथे कोणी एकमेकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणायची नाही , की एकमेकांवर अवलंबून रहायचं नाही ...अनेक अर्थ  ! जंगलात , रानावनात ,   एखाद्या तल...