लग्नाला जाते मी
मुक्ताबाई दीक्षित ... जुन्या म्हणजे आपल्या आजीच्या काळातल्या प्रथितयश लेखिका ! जरा बादरायण संबंधाने त्या माझ्या आजी. त्यांचं प्रसिध्द पुस्तक 'हे तो प्रचितीचे बोलणे'. त्यात त्यांचा एक लेख आहे, 'लग्नाला जाते मी sss ' असा. मी १०-११वीत असतांना तो वाचला होता. त्यानंतर नाही. पण त्यातलं जे आठवतंय, ते मनात अगदी ताजं आहे आणि आता सत्तरीच्या जवळ आल्यावर तर ते अगदीच पटतंय ... कुठे लग्नाला जाणं, मग ते गावांत असो का परगावी ... ते एक मोठं आव्हान वाटतं आजकाल, काही वर्षांपूर्वीही तसंच वाटायचं, पण तेव्हा ते thrill मधे जमा व्हायचं, आता adventure वाटतं ! आता कुणाचं निमंत्रण आलं की , माझ्या पोटात गोळा उठतो. उन्हाळा-पावसाळा असेल , तर तो गोळा दिवसागणिक मोठा होत जातो ! पहीला प्रश्न ... काय कपडे ? अर्थात साडीच ... लग्नाला जातांना , ड्रेस घालण्याइतकी मी आता तरुण नाही, आणि पुन्हा ड्रेस घातलेला 'चालण्या'इतकी म्हातारी ही नाही, तेव्हा साडी ही ओघाने आल...