२६ जानेवारी
२६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन . कधी नव्हे ते लवकर उठून, स्वैपाक, अंघोळ, देवपूजा आटपून ९च्या ठोक्याला मी TV समोर हजर ... परेड पहायला ! बाकी इतर वेळी , कोणाचं सरकार असो , त्याला घालून-पाडून बोलायला कमी न करणारी मी, परेड पहायला बसले की त्यांचं कौतुकच वाटतं, आणि 'अभिमानाने ऊर भरून येणे' म्हणजे काय ते कळतं ..! भले ही TV वर सगळं दाखवत नसतील, आपण super-powers पेक्षा ranking मधे खूप खाली असू, पण आपण अगदीच 'बिचारे' नाही आहोत , असं वाटतं. एरवीचा गलथानपणा, मुजोरी, बेशिस्तपणा, 'चलता है' अशी प्रवृत्ती, भ्रष्टाचार, महिलांना दिली जाणारी वर्तणूक ... घरात-बाहेर सगळीकडेच ... हे परेडमधे कुठे दिसत नाही, आणि जिवाला 'सुकून' मिळतो. ' दिलासा' हा शब्द कमी पडतो, 'सुकून' मधे जो 'सुकून' आहे तो special च ... !! दिल्लीतला विजयपथ, राष्ट्रपती भवन, हे सगळं इंग्रजांनी बांधलं, पण त्याची चाळण नं करता, आपण ते निदान नीट maintain करतोय ह्याचं अप्रूप वाटलं....