लग्न पहावं करून
मुलाचं लग्न ठरलं, आणि घरात एकदम गडबड सुरु झाली ! ग्रहण सुटावं आणि चंद्र - सूर्याचं मुखदर्शन व्हावं तसं ! हे करू, ते करू, आधी हे करायचं, ते मात्र अजिबात नाही ..... चर्चा, चर्चा आणि वाद ! घरात एकदमच लोकांचं येणं जाणं वाढलं. एरवी शांत झोपलेलं घर एकदम उठून कामालाच लागलं ! ... आणि जाणीव झाली की आपल्याला काहीच माहीत नाही, अनुभव नाही, आणि मुख्य म्हणजे हे सर्व जगाला आपल्या आधीच माहीत आहे ! नातेवाईक आणि मित्र मंडळी पुढे सरसावली, सल्ले आणि अनुभव ह्यांचा पाऊसच. अधूनमधून खणखणाटही , खरंय,लग्न म्हणजे काही खेळ नाही ... खेळ नाही कसा ? खेळच . अगदी मैदानी खेळ, बायकांचे खेळ, बुद्धिबळाचे डाव ... सर्व काही. पहिल्याच सलामीला बहीण आली , " बाई गं , ताई गं , हा ' मेमरी गेम ' बरं का ! कधी, कुठे, केंव्हा, काय नेसणार आहेस, दागिने काय घालणार आहेस, लिस्ट कर. काही नसेल तर करून घे. " काय मस्त आयडिया ! परत प...