फोनेटीक्स
इंग्रजी भाषा - परक्यांची भाषा, गुलामीची भाषा वगैरे वाद नेहेमीचेच , आणि ही ग्लोबल भाषा, essential for s urvival वगैरे प्रवाद ही नेहेमीचेच. तरीही सर्वांना ही शिकायला लागतेच अन् काहींना आवडतेही. कारणं काहीही असोत, आपण ही भाषा शिकतो, शिकवतो, आणि हे करतांना गमतीचे किस्सेही होतातच ! एकाच अक्षराचे वेगवेगळे उच्चार ( cat मधे C चा ' क ' आणि city मधे C चा ' स ' ), spelling मधल्या anomalies, आणि atrocities, आणि त्यावरचे विनोद नेहेमीच ! पण प्रत्यक्षात घडलेल्या मजा काही औरच असतात ! माझा धाकटा मुलगा जरा 'dreaming type' आहे . हाताने एक काम करत असतो, आणि मनात काहीतरी वेगळाच विचार चालू असतो. आणि भूक वगैरे लागली की मग तर विचारूच नका. एकदा ' बनाना ' चे स्पेलिंग पाठ करत होता आणि काहीतरी विचारही . नंतर मी वहीत पाहीलं तर दहा वेळा स्पेलिंग लिहून काढलं होतं पण ते bananana असं ! बी ए एन ए एन ए...