Posts

आठवणीतला श्रावण

      श्रावण महीना म्हटलं की, 'ऋतु हिरवा, ऋतु बरवा' !   पण मला श्रावण महीना नेहमी रंगीबेरंगीच दिसतो ... फक्त हिरवाच नाही, तर खूप साऱ्या रंगांनी नटलेला, सजलेला ... !   पाऊस-पाण्याने सगळं जग हिरवंगार आणि त्यात रंगांचे ठिपके दिल्यासारखी फुलं ... !  आणि जवळजवळ रोजच कोणता ना कोणतातरी स्पेशल दिवस !   श्रावण म्हंटलं ,  की माझं time-machine  सुरु !   मी पोहोचते माझ्या गावात ...      श्रावणी सोमवार ,  की हरीपूरची जत्रा !   तेव्हा होती तितकीच आत्ताही माझ्या मनात ताजीतवानी. ...  आणि बरंच काही... ! मंगळवार म्हटलं की, मी पोहोचते कोणा ना कोणाच्या मंगळागौरीला . बुधवार-गुरुवार जरा शांत , की लगेच शुक्रवार .....  की निघाले मी माहेरवाशीणींबरोबर !   गूळ -फुटाणे आणि दूध !   तशीच नागपंचमी !   नागपंचमीची एक आठवण म्हणजे, मी तेव्हा तिसरीत होते. नुकतीच मराठी शाळेत दाखल झालेले.   बाईंनी सांगितलं की, उद्या नागपंचंमीवर  निबंध लिहून आणायचा ... दहा वाक्य हवीत . पह...

पाकसिद्धी - ४

      सध्या मी खूप बिझी आहे.  धाकटा मुलगा - सून भारतात आले आहेत, घरी रहात आहेत.   आणि त्यांच्या न केलेल्या फर्माइशी - त्यांच्या आवडीचे पदार्थ  करण्याचा मी चंग बांधला आहे.   गेल्या काही वर्षांत, त्यांना काय आवडतं हे मी खरंच विसरले आहे.  दोन्ही मुलांच्या आवडी-निवडी दोन टोकांच्या.   त्यामुळे ती लहान असतांना, स्वैपाक करतांना काही standard मेनू होते.   ही भाजी केली की ती  कोशिंबीर ... प्रत्येकाच्या आवडीचा एक पदार्थ !   आता ते आठवत बसते.   मागे आपण म्हणायचो, 'साधूसंत येती घरा, तोची दिवाळी-दसरा ...'   आता मी म्हणते ' मुलं बाळं येता घरा, तेच सण साजरे करा ..'. आषाढ असो नाहीतर मार्गशीर्ष - काही फरक पडत नाही.   त्यांच्या आवडीचे जमतील ते पदार्थ करायचे !   मोठा मुलगा आणि त्याचे कुटुंब weekend ला आले की असंच होतं ... मग तो म्हणतो, "आम्ही दुष्काळातून आल्यासारखं तू करते आहेस ... किती पदार्थ करतेस ... "      "अरे, तुम्ही तरुण मुलं ... खा नां जरा पोटभर , आवडीचं ... ...

पाकसिद्धी - कला का शास्त्र - ३

     सध्या  मला सर्दी झाली आहे.   आता ती ३-४-५ महिने राहील, आल्यासारखी !  ज्या वेगाने मॉन्सून येतो, त्याच वेगाने ती येते.   कधी कधी एक दोन दिवस आधी ही.   आणि तो परत निघाला की ती ही जाते, त्याच्या मागून एक-दोन दिवसांनी.   तोपर्यंत पाऊसच पाऊस.   पहिले आठ-दहा दिवस नवऱ्याला जरा कौतुक असतं.   नंतर त्यालाही सवय होते..   पण ते पहिले ७-८ दिवस मी माझी सर्दी एन्जॉय करून घेते !   छान लाल डोळे, पाणी गळतंय,  आवाज आजारी माणसासारखा.  अगदी ' पडू आजारी , मौज हीच वाटे भारी ' !! जो येतो तो, "अरे, तुला बरंच बरं नाहीये की ..."    एरवी ढुंकूनही न पहाणारी मंडळी उपाय सुचवू लागतात ... त्यातला एक उपाय म्हणजे नवरा एक काढा करून देतो ... त्यात चवीपेक्षा तो प्रेमाने (?) करतोय याला महत्व !   उपयोग होतो की नाही ... माहीत नाही ... त्याची सुरुवात अशी होते ... "आज तू काही करू नकोस ... फक्त एक वरण - भात कर, नाहीतर खिचडी-पापड-कढी  ... मी तुला रात्री अगदी शास्त्रोक्त काढा करून देतो ... ...

फोबिया

      आज Doctor 's day !! त्या निमित्ताने लिहिते आहे ....! माझ्या आयुष्यात मैत्री , प्रेम , जिव्हाळा , शत्रुत्व , नातं , इत्यादी सर्व तऱ्हेने आलेल्या - गेलेल्या , असलेल्या- नसलेल्या , भूत - वर्तमान - भविष्य , यातल्या सर्व डॉक्टर लोकांना माझा नमस्कार ...! हे जरा आपण दृष्ट काढतो , तसं वाटतंय नं ...तसेच आहेत सगळे ....ते आहेत , म्हणून आपण आहोत ....!!!! तर ....माझ्या लहानपणी , तसा आमच्याकडे हा दिवस , दर दोन - तीन महिन्यांनी यायचा ... सर्दी- खोकला, ताप , गोवर , कांजिण्या , गालगुंड, मलेरिया इथपासून , ते दुसरं काही नसेल , तर ' हिच्या पायाला arch नाही , हिचे दात अती वाकडे आहेत , चष्मा लागलाय , खोक पडली - चार टाके घाला ...असं काहीही असायचं !!!       मला डॉक्टरांची भीती नाही वाटायची ...रोज मरे , त्याला कोण रडे ??....होऊन होऊन काय होणार ? ते नकोसं असं ...डार्क गुलाबी , जिऱ्याच्या वासाचं औषध ...पण ....  माझा प्रॉब्लेम वेगळाच असायचा ...अजूनही आहे ...त्याचं असं आहे ...........    .... मला खूप phobias आहेत. सगळेच फोबिया claustrofobia , agorafobia क...

पाकसिद्धी - कला का शास्त्र - २

    नुकतीच  सांगलीला जाऊन आले.  मित्राच्या मुलीच्या लग्नाला.   डोळे-कान-जीभ  सगळे senses तृप्त झाले ...!!! त्या श्लोकात म्हंटल्याप्रमाणे ,  ' मिष्टान्नम् इतरे जना: ' ! ह्या ही लग्नात आमचं सगळं मित्रमंडळ ... 'मेनू काय आहे रे'  ... हेच वाक्य बोलत होतो !   आणि खरंच अप्रतीम जेवण ... सुग्रास सुंदर जेवण ... पदार्थ किंवा जेवण - नुसती चांगली चव पुरेशी नसते, त्याचं रूप - दिसणं, स्वरूप - कशाचं केलंय, त्याचा सुगंध, काही बाबतीत स्वैपाकघरातून येणारे फोडणीचे, झाऱ्यांचे, गरम तेल - तुपात पदार्थ पडतांनाचे आवाज, जेवतांना त्यांचा हाताला लागणारा feel, आणि मग सगळ्या मसाल्यांचं - चवींचं एकमेकांशी होणारं interaction , रंगसंगती  ... हे सगळं जमून येतं, तेव्हा खरी रसना तृप्त होते....  त्याकरता या पाकसिद्धीची देवता अन्नपूर्णा प्रसन्न असावी लागते !!! ...ती त्या दिवशी अगदी खूष होती ...म्हणून , इतका सुंदर स्वयंपाक !!!!....          हे सगळं एन्जॉय करत जेवण झालं आणि तो अफलातून पदार्थ समोर आला !   संत्रा मंत्रा...

पाक सिद्धी - कला का शास्त्र ?

    काल उगीचच काहीतरी 'आवरायचा' mood होता.   तसा तो नेहमी क्षणभंगूरच असतो, म्हणून काहीतरी सोपसं आवरावं , म्हणून पुस्तकांचं कपाट आवरायला काढलं.    खाली जमिनीवर बसून सर्वात सोपा म्हणजे लहानसा गठ्ठा काढला ... आणि एक छानश्या कापडात गुंडाळलेलं पुस्तक दिसलं ! आपण जुन्या पोथ्या, गुरुचरित्र किंवा ज्ञानेश्वरी, गजानन विजय असे स्पेशल ग्रंथ गुंडाळून ठेवतो - तसं.   उघडून पाहिलं तर ... 'गृहिणी मित्र अर्थात हजार पाकक्रिया' - सौ लक्ष्मीबाई धुरंधर !     अगदी जीर्ण झालेलं, वरचं कव्हर गायब, पण आतल्या पानावर सासूबाईंचं नाव !....  ओहो, म्हणजे हे ते सिक्रेट पुस्तक ! ८० वर्षांहून जुनं ! ...     आणि, कधी ते उघडून वाचायला लागले ते कळलंच नाही !   अगदी मीठ लिंबापासून, त्या वेळच्या सर्व पदार्थांच्या कृती लिहिलेल्या त्यात !    कधीही न ऐकलेले पदार्थ - अगदी नॉनव्हेज सुध्दा !      आजकालच्या भाषेत 'एकदम भारी' पुस्तक !      Recipes वाचतांना मात्र हळुहळु धीर खचायला लागला !    पाव शेर काजू, पाव...

नट्टापट्टा

    चार दिवसांपूर्वी शाळेतल्या मैत्रिणीचा फोन आला, ... "काय गं, येतीयेस नं प्रसादच्या मुलीच्या लग्नाला ? ... आपलं ठरलंय नां, सुंदर साडी नेसायची ,  नट्टापट्टा करायचा, खूप मिरवायचं नं ... "  ...हे शाळेचं reunion झाल्यापासून शाळेतल्या कुणाकडे जायचं, भेटायचं म्हटलं, की सगळेजण शाळेतल्या वयाचे होतात .... ! उत्साहाला  उधाणच  येतं....     काल एका मित्राचा फोन आला, ... "काय ?      तयारी झाली का ?"     "हो !  बॅग पण भरून तयार आहे ! ... तुझं काय ?   तुझी तयारी कुठपर्यंत ?"     "अर्धी झाली !    म्हणजे कपडे कालच  कपाटातून काढले, अन धुवायला टाकलेत.   उद्या शर्टाला इस्त्री केली की झालं ... आम्हाला काय, no   नट्टापट्टा ... आता गळ्यात साखळी, तीन तीन बोटांत अंगठ्या घालून गोजिरवाणं दिसायचे दिवस गेले गं ... "     त्याच्या आवाजात काहीतरी miss केल्याचा सूर होता किंचितसा ...      तो मला माझ्या लहानपणात घेऊन गेला ... आधीच नट्टापट्टा म्हंटल्यावर म...