Side effects
काही वर्षांपूर्वीची गोष्ट . माझी एक मैत्रीण आजारी पडली . खूप ताप, सर्दी ,खोकला . तेव्हा कोरोना नव्हता , म्हणून बरं , नाहीतर admit च केलं असतं . तिला भेटायला , तब्येतीची विचारपूस करायला मी गेले . "औषध घेतलं का ...एक क्रोसीन घेऊन टाक ..." वगैरे सल्ला मी दिला . ती लगेच म्हणाली , " नको गं बाई , त्याचे साईड इफेक्ट्स फारच वाईट असतात ..." साईड इफेक्ट्स ? पण मला वाटतं , ताप उतरतो हा मुख्य इफेक्ट ना ...नंतर बघता येईल बाकीचं .."... " छे छे , त्याने पोट दुखतं , अल्सर होतो , पचन बिघडतं ...." .
मग मला कळलंच की , तिच्या वाचनात एक काहीच्या बाही पुस्तक आलं होतं . आणि सगळी औषधं , छान छान पदार्थ , किंबहुना , जगातली प्रत्येक गोष्ट विषारी आहे , कारण , त्या सर्वांचे साईड इफेक्ट्स फार वाईट आहेत , असं तिचं पक्क मत बनलं होतं .. तिच्याशी मी बराच युक्तिवाद केला , चर्चा केली , वाद घातला . " अगं , प्रत्येक पदार्थाचा , औषधाचा , त्याच्या परिणामांचा एक संच असतो , spectrum असतो . काही जास्त , काही कमी ...त्यातलं आपलं दुखणं बरं करायला जे योग्य असेल , जास्त परीणामकारक असेल ते औषध ...! दहा वर्षे रोज खाल्ल्यावर त्या औषधानी अल्सर होईल , म्हणून ताप घालवायला तू दोन दिवस ते घेणार नाहीस ? असं तर मग रोजचं जेवायलाही नको ..."
तिने तोच धागा पकडला . " हो हो , बोल , तू रोज का जेवतेस ?" मी म्हंटलं , " भूक लागते म्हणून , कधी आवडता पदार्थ म्हणून , कधी आनंद मनवायला , तर कधी टेन्शन घालवायला , कधी कधी टाईमपास...! बाकी , ते व्हिटॅमिन्स , पचन संस्था .... हजार गोष्टी पुस्तकात , त्या बोनस !! ...यात साईड इफेक्ट चा कुठे प्रश्नच नाहीये ..काही संबंधच नाहीये .…..." मला वाटलं , मी तिला गप्प बसवलं ...! तर ती म्हणते , " आणि वजन वाढतं आपलं ते ? हा साईड इफेक्ट नाहीये ?" मी तिच्या पुढे हात टेकले . समोरच्या बशीतला एक पेढा तोंडात टाकला ...आपली बोलतीच बंद ...!
घरी आल्यावर , तोच एक छंद , ध्यास ...प्रत्येक गोष्टीचा साईड इफेक्ट शोधत बसणे . आधी एक मजा म्हणून , मग धास्ती म्हणून, आणि मग तो एक चाळा झाला मनाचा . सगळ्या गोष्टी विषारी ! फुलांचा वास घेतला की छान वाटतं . साईड इफेक्ट ....शिंका . त्याच्यावर औषध घेतलं की शिंका बंद ...साईड इफेक्ट ...झोप ...झोपच झोप !! झोप झाली , की मी टुणटुणीत ...साईड इफेक्ट ..नवरा हुप्प ...! उशिरा उठले मी , म्हणून , त्याला चहा करावा लागला .....
आजकाल तर काय , वस्तूंचाच नाही , तर action , आवडी , कशाचाही साईड इफेक्ट वाईटच असतो . साईड इफेक्ट म्हणजे त्रास ...आपल्याला , नाहीतर दुसऱ्या कुणाला !!! खरं म्हणजे , हा फेनोमेना लहानपणीच लक्ष्यात आला होता ! मी गोष्टीचं पुस्तक वाचायला बसलेलं कुणालाच खपायचं नाही . त्यांना त्रास व्हायचा ...आईला तर फारच ! " एकदा पुस्तक डोळ्यासमोर धरलं , की हिला कशाचंच भान रहात नाही , अजिबात मदत करत नाही ..." वगैरे !! माझ्या वयपरत्वे , त्याचं " हात लावत नाही कामाला ..." असं रूपांतर झालं ...आता मात्र त्याचं नुसतं बसून खाणे ...असं नको व्हायला !!
मला विणायला आवडतं , भरतकाम आवडतं , kindle आवडतं ! Facebook आवडतं ..पण त्याचा त्रास इतरांना का होतो ते समजत नाही !! नवरा म्हणतो , " अजून पाच मिनिटं झाली नाहीत ? गेला तास भर तू हेच म्हणतेआहेस ..." नात म्हणते , " आजी , ते विणकाम काढायचं नाही बाहेर ...माझ्याशी खेळ .." नातू खूपच सभ्य आहे , " आजी , तू प्लिज , फोन तिकडे ठेऊ शकते का ? मी तुला माझा बाऊ दाखवतोय , तर तू म्हणते , की वा , छान . म्हणजे , तू बघत नाहीये माझ्या बाऊ कडे ...." म्हणजे , ह्या सर्वाचा माझ्यासाठी main इफेक्ट happiness असला , तरीही ते नको , कारण , त्यांच्यावर negative इफेक्ट !!
नुकतीच मला याची प्रचीती आली . काहीतरी कारणाने , मी फार म्हणजे फारच depressed होते .काहीच करू नये , काही खाऊ पण नये असं वाटावं , इतकं ! मला असं कधी होत नाही !! उगीच वेळ घालवायचा , म्हणून फोन मध्ये बघत बसले होते ...आधी कपडे ...मग दागिने ...! Costume jewellery , semi precious , मग 1 gm , मग चांदी , सोनं करत करत , diamond section ला पोहोचले ..on line ...! आणि , एक खूप छान गळ्यातलं दिसलं , पहाताक्षणीच आवडलं !!! नवऱ्याला म्हंटलं " हे बघ , किती cute आहे गळ्यातलं ..." तो लगेच , " नको ..." " अरे , पहा तर खरी , मंगळसूत्र आहे ....हे बघ , दोन काळे मणी आहेत ..." मी . मंगळसूत्र म्हंटलं , की निदान ताबडतोब 'नाही' म्हणत नाही . तेवढाच , त्याला पटवायला वेळ मिळतो ! आणि , तसंच झालं ! " बघू , काय ते " ...त्याला दाखवला फोटो . त्याने असा पाहीला ... तसा पाहीला ... झूम केला ...खाली वर केला ...मग म्हणाला , " नकोय आपल्याला "...."का रे ? ...किती सुंदर आहे ...तुला माहितीय ,मला depression आलंय ...छान आहे की ही retail therapy ..." मी माझं घोडं पुढे दामटलं ." बरं वाटेल मला .." ..." हो , छान आहे therapy , पण तिचे साईड इफेक्ट्स वाईट आहेत ...माझ्या बँक बॅलन्स ला ...."
Some side effect .....
Awesome Side Effects ! Yes, I remember it ! You were very fond of reading ! And I used to hate it !
ReplyDeleteThank you , Vinaya
Deleteमला ही नेहमीच वाटतं..side का..inner effect,outer effect..दुसर्या वर effect ..असं का नाही
ReplyDeleteThank you संजू !😊
ReplyDeleteFANTASTIC SIDE EFFECTS ------ DO MORE EFFECTS.
ReplyDeleteThank you , yashodhar !
ReplyDelete