50 years reunion च्या निमित्ताने .. चिमण्या

  

  " हॅलो , तुला माहीत आहे का , " मेधाचा फोन आला .     "आपल्या वर्गाचं reunion आहे , 50 वर्षं झाली ना आपल्याला , मॅट्रिक होऊन "
"ऑ , झाली पण इतक्यात ?"
" हो , अगं जगाच्या हया टोकापासून ते त्या टोकापर्यंत पसरल्या आहेत  ,सगळ्यांना शोधतोय  "
.... दाणे टिपून, चिमण्यांनी भुर्रर्र कन उडून जावं तसं मला वाटलं !
       आणि मग मी आठवायला लागले , आपला वर्ग ... खिडकीपाशी पहील्या बाकावर मी आणि गीता , आमच्या मागे मेधा आणि गोळी , त्यांच्या मागे रजनी आणि बेन !!असं करता करता , सगळा वर्ग डोळ्यासमोर उभा राहीला ..
   .....आणि आपली हिरवी साडी !....आणि ती कशी नेसायची ...पदर घेतल्यावर उजव्या हाताच्या करंगळी पर्यंत येऊन समोर खोचला पाहीजे !!  सुरूवातीला आई नेसवून द्यायची , मग काय बिशाद की तो सुटेल !! ' पदर खोचून कामाला लागणे ' म्हणजे काय ते आता कळतं !
       त्यावर पूनम नी गाणं केलं होतं , " शालू हिरवा , पाचूनी मरवा , वेण्या वरती बांधा ... " , पुढचं मी सांगायला नकोच ! .. तिचं गाणं ऐकतांना हसून हसून पुरेवाट ! ...
     मंदा , संजू , गोळी , गाणाऱ्या मैना ! मेधा , उजू डान्स ! नीलिमा साळी आणि संजू सावळे चित्रं , रजनी म्हणजे वायू वेग ! ....आणि आपलं दहावीतलं हस्त लिखित ' अलविदा ' !
अ तुकडी म्हणजे सगळ्याच अभ्यासात पुढे , कोणी जास्त पुढे ! ! अभ्यासाच्या दिमाखदार  पार्श्वभूमीवर सगळ्याच जणी  ' चमकते सितारे ' !
     मी दहावीत नवीन आलेली , पण चौथी पर्यंत ह्याच शाळेत असल्यामुळे सगळ्यांची ओळख होती ! जरा मेधाची दादागिरी चालायची ," हं, आज तुला मी सगळी वृत्ते शिकवते , आज टेस्ट असेल " ...  असं म्हणून ती माझा ' क्लास ' घ्यायची ! दोन तासात कशी नाही पाठ होत ! ..मुलीचे पाय पाळण्यात दिसले ! उगीच नाही ती ' services' मध्ये ऑफिसर झाली !!
   आणि गीता ! अभ्यासातील काही भाग मी जुन्या शाळेत शिकले होते , तर काही भाग एकदाही नाही , मग सगळं डोक्यावरून जायचं ! मला पेंगायला व्हायचं . की ती म्हणायची , " ए , झोपू नकोस , बाई मला रागावतील , तुला का उठवलं नाही  म्हणून " ! काल तिची कविता ऐकतांना हा   'जॉली छुपा रुस्तुम ' पुन्हा दिसला !!
   वंदना प्रयाग आणि माझा वाढदिवस एका दिवशी !  मला खूप आठवण  आहे !!
    देशपांडे बाईंनी मला संस्कृत नाटकात घेतलं . पण एकही वाक्य नाही ! मी त्यांना म्हंटलं , " मी कशाला पाहीजे ? " त्या म्हणाल्या , " कारण , मला तुझी hairstyle करायची आहे ..!" हे कशी विसरू मी ?
    इथे  बंगलोर मध्ये एक महत्वाची कंमिटमेंट असल्यामुळे मी येऊ शकले नाही . पण सगळे vdos पाहील्यावर
'defered live telecast ' पाहील्या सारखं वाटलं !
   मागची 50 वर्षं , सगळ्या जगभर विखुरल्या , आणि reunion च्या निमित्ताने पुन्हा परत येत आहेत , सगळ्यांना पुन्हा भेटायचं आहे , मधल्या 50 वर्षांचा बॅकलॉग भरून काढायचा आहे , म्हणून म्हणावसं वाटतं ,
      " या चिमण्यांनो , परत फिरा गं ...... "
                                              - अलका (थत्ते) कुंटे .

Comments

  1. वा, अलका, छान लिहिले आहेस. वर्गात असल्या सारखे वाटले.


    ReplyDelete
  2. तेजस्विनी कुलकर्णी नवरे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणपती

बकेट लिस्ट

Alice in Wonderland