सखा
एक मित्र ..... सगळ्यांना असावा ,
काळा-गोरा ... उभा-आडवा ...
... कसाही दिसावा,
लहानपणी, आपण शाळेत पोचल्यावर, धावत समोर येणारा,
आपला हात धरून, वर्गात बाकापर्यंत पोचवणारा,
हात पाठीमागे बांधून, सरांच्या स्टाईलमध्ये,
'उशीर का झाला ?' म्हणून विचारणारा,
आपण वाढदिवसाला दिलेलं चॉकलेट... 'तू खा' म्हणत मधल्या सुट्टीत परत देणारा,
पण, त्याला न देता आपण बोरं खाल्ली,
तर मात्र चिडून रुसून बसणारा,
स्वतः मित्रांबरोबर हुंदडणारा ,
आपल्या मैत्रीणींना मात्र नेहेमीच पाण्यात पहाणारा,
पार्ट्या पाडून खेळतांना, आपल्याला 'मागून' घेणारा,
आणि आपली पार्टी हरली की,
'तुझ्याच मुळे' ... म्हणत, पाठीत गुद्दे मारणारा !
जरा मोठं होतांना....
जसजसा उंच होईल, तसा दूर दूर रहाणारा,
पण जाता येता दिसला ,की हळूच हसून बघणारा,
आपल्याला कोणी चिडवलं, तर रागानी लाल होणारा , आणि त्याला सांगायला गेलं तर, 'दे की दोन-चार ठेवून' असं आपल्यालाच रागावणारा !
शाळा संपल्यावर , कुठेतरी गायब ....
अधून मधून केव्हातरी धूमकेतू सारखा उगवणारा,
कधी कुठे भेटला तरी, काहीच न बोलणारा,
पण, एकटक बघणाऱ्या डोळ्यांतून, बरंच काही सांगणारा !
तो सहचर असेल-नसेल .... तो नशिबाचा भाग,
पण आपली निखळ मैत्री, नेहेमी तशीच राखणारा,
वय - पैसा - स्टेटस ... घरी ठेऊन येणारा,
मित्र-मैत्रिणींना भेटतांना, केवळ मित्र म्हणूनच भेटणारा,
आपल्या सुखदुःखात नेहेमी बरोबर असणारा !
हातातलं काम टाकून , लगेच मदतीला धावणारा,
आपल्या डोळ्यातलं पाणी पाहून,
खूप कासावीस होणारा,
'आला मंतर ... ' करू का, असं हसत हसत विचारणारा,
शाळेत असतांना,
'दात पडकी म्हातारी' ........ असं सारखं चिडवणारा,
साठीनंतर भेटल्यावर मात्र, एक झकास शीळ घालणारा !
वयाचा , जगाचा मुलाहिजा ,
अजिबात न ठेवणारा,
पाठीत एक धपका नाहीतर डोक्यावर टपली देणारा,
कधी मनातली रुखरुख फोन करून सांगणारा,
'आता काय करू गं ... ' असं मनापासून विचारणारा !
आपण घरी निघालो , की मात्र कावरा-बावरा होणारा,
आणि निघता निघता हातात , बोरांची पुडी कोंबणारा,
'येत जा हो लवकर ...' म्हणत,
आपल्या नवऱ्याशी शेक-हॅन्ड करणारा,
'खूप कामं पडली आहेत ... येतो...' म्हणत, मागच्या मागे सटकणारा ....
....एक जिवलग मित्र सगळ्यांनाच असावा,
जशा जिवाभावाच्या मैत्रिणी ...,-
तसा मित्र का नसावा ? ? ?
पाच वर्षं लागोत का पन्नास......
..असा एक तरी सखा...
कधी ना कधी भेटावा,
आणि आयुष्यभराचा ध्यास ...
.....अचानक पूर्ण व्हावा .... !
Very nice and touchy? Everyone will agree with you!Was missing your blog.
ReplyDeleteThank you so much
Deleteअलका,छान सहज अभिव्यक्ती !
ReplyDeleteThanks a lot , Sanju !सहज मनातलं ...!
Deleteकस काय सुचत तुला एवढ छान?
ReplyDeleteजरा गरीबाच्या डोक्यावर हात ठेवा
वाण नाहि पण गुण तरी लागेल
Thank you , प्रमोद
Deleteव्वा !
ReplyDeleteSAHAWAAS is essential for such platonic freindship
ReplyDeleteTrue !
Delete